शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Aurangabad : औरंगाबादमध्ये पुण्याहून परतलेला आयटी अभियंता आणि एका गृहिणीस कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 18:06 IST

परदेशातून परतलेली महिला आणि पुण्याच्या आयटी अभियंत्याचा समावेश

ठळक मुद्देपुणे येथील एनआयव्ही येथे केले क्रोसचेक अहवालाच्या 'क्रोसचेक'मध्ये झाली पुष्टी

औरंगाबाद : जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्याचे खळबळ उडाली आहे. बुधवारी या दोघांचेही नमुने तीव्र कोरोना संशयित असल्याने पुणे येथील 'एनआयव्ही' कडे पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पुण्याच्या एनआयव्हीमधून आलेल्या अवहालावरून त्यांना कोरोनाची लागण झाल्याला पुष्टी मिळाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही.कुलकर्णी यांनी सांगितले. 

जिल्हा रुग्णालयात मंगळवारी १३८ लोकांची तपासणी करण्यात आली होती. त्यात कोरोनासारखी लक्षणे आढळून आलेल्या ९ जणांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. यातीलन ७ जनांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर अन्य दोन जणांचे अहवाल जाहीर करण्यात आले नव्हते. तीव्र कोरोना संशयित म्हणून त्यांच्या लाळेच्या नमुन्याची पुणे येथील ' एनआयव्ही'ला येथे पुन्हा तपासणी करण्यात आली. येथून प्राप्त अहवालावरून त्यांना कोरोना झाल्याची पुष्टी मिळाली आहे.

एक महिला आणि एक पुण्याहून आलेला आयटी अभियंता  लागण झालेला एक रुग्ण पुणे येथे आयटी अभियंता आहे, तो  काही दिवसांपूर्वीच शहरात परतला होता. तर दुसरा रुग्ण एक महिला आहे, तिचा पती नुकताच दिल्ली येथून परतला होता. दरम्यान, तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यांची परत चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

जिल्हा रुग्णालयात 'हाय अलर्ट'शहरात कोरोना लागण झालेली दोन रुग्ण आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय 'हाय अलर्ट' वर आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या