शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus In Aurangabad : ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात ‘सेरो सर्वेक्षण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 19:49 IST

या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देतपासणीसाठी जिल्ह्याची तीन टप्प्यांत विभागणीतपासणीसाठी रँडम सॅम्पलिंग पद्धतीने घटकांची निवड

औरंगाबाद : केंद्रीय पथकाच्या शिफारसीनुसार जिल्ह्यात आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ‘सेरो सर्वेक्षण’ करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या अनुषंगाने अँटिबॉडीज तपासणी आणि सेरो सर्वेक्षणाबाबत बैठक झाली. जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले, सर्वेक्षणातून शहरात, तसेच जिल्ह्यात कोरोनामुळे झालेला प्रादुर्भाव लक्षात येण्यास मदत होईल, तसेच प्रशासनाला सर्वेक्षणामुळे उपाययोजना करण्यास मदत होणार आहे. यापूर्वी मराठवाड्यातील परभणी, बीड आणि नांदेड जिल्ह्यात सर्वेक्षण झालेले आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर शरीरात विकसित होत असलेल्या आयजीएम अँटिबॉडीज तपासण्यासाठी सर्वेक्षण करून निवडक चाचण्या केल्या जातील. त्या चाचण्यांची तपासणी घाटीतील प्रयोगशाळेत होईल. ही प्रक्रिया दिल्लीच्या धर्तीवर राबविण्यात येईल.

मनपा आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले की, शहरातील ११५ वॉर्डांमध्ये पथके तैनात करून वेळेत सॅम्पल गोळा करून शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. या तपासणीच्या माध्यमातून  शहरातील सर्व घटकांची रँडम पद्धतीने तपासणी करण्यात येणार आहे. जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. ज्योती बजाज, डॉ. नीता पाडळकर, डब्ल्यूएचओचे सदस्य डॉ. मुजीब सय्यद, डॉ. उल्हास गंडाळ, डॉ. शोभा साळवे यांची उपस्थिती होती.

जिल्ह्याची तीन टप्प्यांत विभागणीजिल्ह्याची वाळूज-बजाज महानगर, महापालिका क्षेत्र आणि ग्रामीण, अशा ३ विभागांत विभागणी तपासणीच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. या तपासणीसाठी रँडम सॅम्पलिंग पद्धतीने घटकांची निवड करण्यात येऊन वैज्ञानिक पद्धतीने तपासणीसह अभ्यास करण्यात येणार आहे. घाटीच्या इन्स्टिट्यूशनल इथिक्स कमिटीच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येणार आहे.  या सर्वेक्षणासाठी लागणारे सॅम्पल जिल्हा परिषद, महापालिका एकत्रितपणे प्रयोगशाळेस तपासणीसाठी पाठविणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद