शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर ३.२५ टक्क्यांवर; आरोग्य यंत्रणेचे मृत्यू रोखण्यावर लक्ष केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 19:50 IST

जिल्हात १३ मे पासून कोरोनामुळे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देल्ह्यात आॅक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. महिनाभरात जिल्ह्याचा मृत्यूदर ४.२५ वरून ३.२५ टक्के

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी-अधिक होत राहणार आहे. त्यामुळे रुग्णसंख्यावाढीच्या प्रश्नाऐवजी रुग्णांचे मृत्यू रोखण्याकडे आरोग्य विभागाने अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. 

जिल्हात १३ मे पासून कोरोनामुळे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे. त्यात एकही दिवस खंड पडलेला नाही. तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांना कोरोना विषाणूचा धोका अधिक आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे जिल्ह्यात आॅक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.

जिल्ह्यात रोज रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येपेक्षा यातील गंभीर रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत आणि मृत्यू रोखले जातील, यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. ११ जुलै रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर ४.२५ टक्के होता. महिनाभरात मृत्यूदर ३.२५ टक्के झाला.घाटी रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. घाटीत मंगळवारी दुपारपर्यंत १४१ गंभीर रुग्ण दाखल होते. रुग्णांसाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते; परंतु उशिरा दाखल होण्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळत नाही आणि  मृत्यू ओढवतो. त्यामुळे वेळीच रुग्णालयात दाखल होणे महत्त्वाचे असल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले. 

महिनाभरात २०८ रुग्णांचा मृत्यू ११ जुलै रोजी जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही ८,२१६ होती, तर एकूण मृत्यूचा आकडा हा ३५० होता. महिनाभरात २०८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर रुग्णसंख्या दुप्पट झाली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या मंगळवारी (दि.११) दुपारपर्यंत १७,१२५ झाली, तर एकूण मृतांची संख्या ५५८ झाली.

५० वर्षांवरील रुग्णांकडे अधिक लक्षकोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत राहील; परंतु त्यापेक्षाही रुग्ण गंभीर होऊन मृत्यू ओढवणार नाही यावर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी ५० वर्षांवरील रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे.- डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद