शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

coronavirus in Aurangabad : कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार पार; आज २४९ रुग्णांची भर, ६ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 18:45 IST

२४ तासांत १२०० स्वॅबचे संकलन, १०६० स्वॅबची तपासणी झाली असून यात २४९ बाधित आढळून आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात सध्या २८९७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.२८५७ कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.आजपर्यंत २७७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद ः जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्येने सहा हजारांचा आकडा गुरुवारी पार केला. सकाळच्या सत्रात २०६ तर दुपारी ४३ बाधितांची भर पडल्याने एकूण रुग्णसंख्या सहा हजार पार गेली आहे. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा २७७ वर गेला आहे. 

सलग द्विशतकी बाधितांची वाढ सुरुच असून, आतापर्यंत सर्वात जास्त स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले. २४ तासांत १२०० स्वॅबचे घाटीत व्हिआरडीएल लॅबकडे संकलन झाले त्यापैकी २४ तासांत १०६० तपासणी अहवाल देण्यात आले. हा आकडा तपासणीचा आतापर्यंतचा उच्चांक होता. बुधवारी करण्यात आलेल्या १२०० स्वॅबच्या संकलनातून गुरुवारी सकाळी २०६ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. दुपारच्या सत्रात ४३ असे २४९ रुग्ण आढळले. त्यामध्ये १४३ पुरुष तर १०५ महिला व अन्य एकाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६०३१ कोरोनाबाधित आढळले असून २८५७ बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आजपर्यंत २७७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने २८९७ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. 

कोरोनाबाधित ६ जणांचा मृत्यूकोरोनाबाधित रांजणगाव येथील ५० वर्षीय पुरुष रुग्णाचा बुधवारी सकाळी ११.१५ वाजता, बेगमपुरा येथील ६९ वर्षीय वृद्ध महिलेचा दुपारी २ वाजता, अविष्कार काॅलनी सिडको एन ६ येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा दुपारी २.१० वाजता, हर्षनगर येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचा दुपारी ४ वाजता, सिल्लोड येथील ४७ वर्षीय पुरुष रुग्णाचा दुपारी चार वाजता, तर सिडको एन ११ सुभाषचंद्र बोस नगर येथील ७१ वर्षीय वृद्ध महिलेचा सायंकाळी सात वाजता उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती घाटी रुग्णालय प्रशासनाकडून गुरुवारी देण्यात आली. 

मनपा हद्दीत आढळले १७४ रुग्ण सिडको १, गजानन नगर, गारखेडा १, काबरा नगर, गारखेडा १, फुले नगर, उस्मानपुरा १, नारळीबाग २, पुंडलिक नगर ४, सिडको एन-अकरा ३, मिसरवाडी २, शिवाजी नगर ६, सुरेवाडी १, जाधववाडी ५, सातारा परिसर ३, छावणी ५, द्वारकापुरी, एकनाथ नगर ६, आयोध्या नगर २, नवनाथ नगर १,  रायगड नगर २, उल्कानगरी १, शिवशंकर कॉलनी १०, एन बारा टी व्ही सेंटर ३, पोलिस कॉलनी, पडेगाव ५, बेगमपुरा १, मेडिकल क्वार्टर परिसर १, रवींद्र नगर २, पडेगाव २, बायजीपुरा ३, समता नगर १, मयूर पार्क १, नागेश्वरवाडी १, रोकडिया हनुमान कॉलनी १, कृष्णा नगर, बीड बायपास १, ज्योती नगर १, एन सात सिडको, बजरंग चौक २, हनुमान नगर ७, उस्मानपुरा २, भोईवाडा २, बन्सीलाल नगर १, कुंभारवाडा २, रमा नगर १, शांतीनिकेतन कॉलनी १, भाग्य नगर १०, सौजन्य नगर १, कांचनवाडी १३, नाथ नगर ३, राहुल नगर ६, देवळाई परिसर १, हायकोर्ट परिसर १, राम नगर १, नवजीवन कॉलनी १, अल्तमश कॉलनी १, ठाकरे नगर ३, एन दोन सिडको १, एन सहा सिडको २, सावंगी हॉस्पीटल परिसर १, सावंगी, हर्सुल २, न्याय नगर १, एन नऊ सिडको २, विशाल नगर ३, एसटी कॉलनी ६, सेव्हन हिल १, गांधी नगर १, गुरु सहानी नगर १, टीव्ही सेंटर १, सदाशिव नगर १, एकनाथ नगर १, खोकडपुरा १, मुकुंदवाडी १, द्वारकानगरी, एन अकरा १, एन बारा, हडको २, नूतन कॉलनी १, राहुल नगर २, जय भवानी नगर १, अन्य १ रुग्ण शहर परिसरात आढळून आले.

ग्रामीण भागात ७५ रुग्ण शिवाजी नगर, वाळूज १, शरणापूर २, चिरंजीव सो,लोकमान्य चौक, बजाज नगर ३, सिडको महानगर २, कमलापूर, बजाज नगर १, जीएम नगर, रांजणगाव १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, पाण्याच्या टाकीजवळ, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, आयोध्या नगर, बजाज नगर १, अनिकेत सो., बजाज नगर १, चिंचबन कॉलनी १, नागापूर कन्नड १ कोहिनूर कॉलनी १, गंगापूर माळूंजा १, वाळूज गंगापूर ३, अरब गल्ली गंगापूर ३, दर्गाबेस वैजापूर १०, करमाड १, चिंचबन कॉलनी, बजाज नगर ३, छत्रपती नगर, बजाज नगर २, द्वारकानगरी, बजाजनगर १, वडगाव कोल्हाटी २, इंदिरा नगर,पंढरपूर, बजाज नगर २, खंडोबा मंदिर, बजाज नगर १, गाडगेबाबा गेट, बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर ६, सिंहगड सो., बजाज नगर ३, क्रांती नगर, तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर ४, वडगाव, बजाज नगर ४, रांजणगाव, बजाज नगर १, स्नेहांकित सो., बजाज नगर १, साऊथ सिटी, बजाज नगर ३, सिडको, बजाज नगर १, दक्ष‍िणमुखी हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर ४  या भागातील कोरोनाबाधित आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद