शहरं
Join us  
Trending Stories
1
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
2
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

CoronaVirus In Aurangabad : काॅन्टॅक्ट ट्रेसिंग घसरली; चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:36 IST

CoronaVirus In Aurangabad : जिल्ह्यात बाधितांचा आकडा घसरला असला तरी पाॅझिटिव्हिटी दर वाढलेलाच आहे

ठळक मुद्देजिल्ह्याची रुग्णवाढ चार अंकांवरून तीन अंकावरआठवडाभर उंचावलेली चाचणी संख्या आता पुन्हा घटत आहे

औरंगाबाद : जिल्ह्यात महापालिका क्षेत्राचा ३० टक्क्यांपेक्षा अधिक तर ग्रामीण भागात २६ टक्क्यांवर गेलेला पाॅझिटिव्हिटी रेट सध्या कमी झाला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील हा दर १६ टक्क्यांपर्यंत पोहोचला. बाधित रुग्णसंख्या घटताना दिसतेय. मात्र, चाचण्यांची संख्या कमी झाल्याने रुग्णसंख्या घटल्याचे आकडेवारीवरून दिसते आहे.

चाचण्या वाढवून पाॅझिटिव्ह रुग्ण अधिक प्रमाणात शोधणे, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग अधिक करण्यावर भर असल्याची स्ट्रॅटेजी जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आली होती. मात्र, आठवडाभर उंचावलेली चाचणी संख्या आता पुन्हा घटत आहे, तर शहरातील चाचण्याही पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्याचे दररोजच्या आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र, जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट अद्याप १६ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. तो फारसा दिलासादायक नसला तरी आणखी तपासणी वाढविण्याची गरज आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करत असताना ग्रामीण भागात चाचणीला अनुत्सुकता दिसून येत आहे.

अँटिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआरचे अधिक अहवाल पॉझिटिव्हअँटिजेनच्या तुलनेत आरटीपीसीआरचे अहवाल अधिक पॉझिटिव्ह येत असल्याचे पहायला मिळत आहे. १५ एप्रिलला आरटीपीसीआर पाॅझिटिव्हिटीचे १६.६५, तर अँटिजेन पाॅझिटिव्हिटीचे प्रमाण ९.८७ टक्के होते. १ मे रोजी आरटीपीसीआरमध्ये २५.४७ बाधित, तर अँटिजेन केल्यानंतर ८.३३ टक्के बाधित आढळले.

ग्रामीण भागात टेस्टिंग कमीचप्रत्येक आरोग्य केंद्रावर किमान १०० तपासणी व्हावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले. कमी तपासणी असलेल्या १३ केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना समक्ष बोलवून खडसावले. मात्र, ग्रामीण भागातून तपासणीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळू न शकल्याने ५० आरोग्य केंद्र आणि ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय, कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून पाच हजारांपेक्षा अधिक तपासण्या एकदाही होऊ शकल्या नसल्याने आकडेवारीवरून समोर आले आहे. ग्रामीण भागात दररोज साडेतीन ते साडेचार हजार चाचण्या होत आहेत. ४५५५च्या वर ग्रामीण भागात चाचण्या झाल्या नाहीत. यात साडेचारशे ते साडेनऊशेपर्यंत रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

तारीख - एकूण चाचण्या -रुग्ण -पॉझिटिव्हिटी दर१ एप्रिल - ६९९५ -१४८१            -२१.१७८ एप्रिल - ८७६४ -१३६२            -१५.५४१५ एप्रिल -९६०३ -१३२९ -१३.२४२१ एप्रिल -९३८५ -१२०७ -१२.८६२८ एप्रिल -७७३५ १३१४             १६.९९१ मे             -६९५० -११३४             -१६.३२२ मे             -६११५             -८३५            -१३.६५३ मे             - ७८३२             -८०१             -१०.२२४ मे             - ७४२०            -९८१             -१३.२२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद