शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

coronavirus : औरंगाबाद @ ४९८; पाणचक्की, जुना बाजार भागात कोरोनाचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 16:39 IST

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांत दोन पुरुष व एक महिला रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद :  शहरात सकाळी १७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यानंतर दुपारी आणखी तीन रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या ४९८ वर गेली आहे. यात सातारा परिसर, पाणचक्की आणि जुना बाजार येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली. 

शहरात चार नव्या भागात कोरोनाचे संक्रमण झाल्याचे समोर आल्याने हॉटस्पॉटमध्ये भर पडली आहे. शुक्रवारी दिवसभरात शंभर रुग्णांची विक्रमी वाढ झाल्यावर शनिवारी सकाळी आणखी १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात संजयनगर मुकुंदवाडी येथील ६, असिफिया कॉलनी १, कटकटगेट २, या जुन्या भागांसह बाबर कॉलनी ४, भवानीनगर जुना मोंढा २, सिल्कमील कॉलनी व रामनगर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. शनिवारी सकाळी आढळलेल्या १७ रुग्णांत १० महिलांसह ७ पुरुषांना कोरोनाची बाधा झाली असून दुपारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांत दोन पुरुष व एक महिला रुग्णांचा समावेश आहे.

शुक्रवारी सकाळी १८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरातील बाधिताचा आकडा ३९६ झाला. त्यानंतर दोन तासातच ७२ एसआरपीएफ जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सायंकाळी नऊ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यात एक एसआरपीफ जवान तर आठ मुकुंदवाडी परिसरातील असे दिवसभरात एकुण ९९ रुग्ण आढळून आले. तर रात्री उशीरा घाटीत प्रसुत झालेल्या रोशनगेट परिसरातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने दिवसभरात कोरोनाने शंभरी गाठली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद