शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

coronavirus : औरंगाबाद @ २१४८; दिवसभरात ७९ बाधितांची वाढ; ५ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 19:32 IST

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या बळींची संख्या ११३ झाली आहे.

ठळक मुद्देदिवसभरात २७ महिला आणि ५२ पुरुष रुग्णांची वाढ

औरंगाबाद : जिल्ह्यात सकाळी ७२ तर  दुपारी ७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तसेच मागील सतरा तासांत एक महिला आणि चार वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या बळींची संख्या ११३ झाली आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१४८ झाली आहे. 

शहरात मागील सतरा तासांत एका महिलेसह चार वृद्धांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली. प्रशासनाच्या माहितीनुसार, ५५ वर्षीय आरीफ कॉलनीतील व्यक्तीला २३ मे रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तीव्र श्वसनविकार, न्युमोनियासह कोरोनामुळे त्यांचा सोमवारी दुपारी तीन वाजता मृत्यू झाला. ४० वर्षीय जाधववाडी येथील बाधित महिलेला सोमवारी घाटीत भरती करण्यात आले होते. क्षयरोग, न्युनोनिया, तीव्रश्वसन विकारासह न्युमोनियामुळे मध्यरात्री दिड वाजता त्यांचा मृत्यू झाला. 

६५ वर्षीय जहागिरदार कॉलनी येथील बाधित वृद्ध व्यक्तीला ६ जून रोजी घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांना मधुमेहासह तीव्र श्वसनविकार होता. कोरोनामुळे न्युमोनिया झाल्याने त्यांचा मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. ७० वर्षीय युनुस कॉलनीतील वृद्धाला ४ जुनला घाटीत भरती करण्यात आले होते. मधुमेह, उच्चरक्तदाब, तीव्र श्वसनविकार आणि कोरोनामुळे झालेल्या न्युमोनियाने त्यांचा मंगळवारी सकाळी ७.१५ वाजता मृत्यू झाला. ८३ वर्षीय रमानगर,क्रांतीचौक येथील वृद्धाला सोमवारी घाटीत भरती करण्यात आले होते. त्यांचा न्युमोनियासह तीव्र श्वसनविकाराने मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूपश्चात मंगळवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. असे एकूण पाच मृत्यू गेल्या सतरा तासांत घाटी रुग्णालयात झाले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या ११३ झाली आहे, असे घाटी प्रशासनाकडून कळवण्यात आले.

येथे आढळले कोरोनाबाधित : वडगाव कोल्हाटी-१, बजाजनगर (मोरे चौक) -३, पंढरपूर परिसर-१, बारी कॉलनी-२, रोशन गेट-३, कोहिनूर कॉलनी (पानचक्कीजवळ ) -१, नागसेन नगर (उस्मानपुरा) -१, भवानीनगर (जुना मोंढा)-१, मिलकॉर्नर-१, संजयनगर (मुकुंदवाडी)-२, असेफिया कॉलनी-१, बुद्धनगर (जवाहर कॉलनी ) -१, जाधववाडी-१, पेठेनगर (निसर्ग कॉलनी)-१, नारेगाव-१, एन-११ (मयूरनगर, हडको)-१, बिस्म‍िला कॉलनी-१, रहेमानिया कॉलनी-२, एन-८ ( सिडको)-१, हर्सूल परिसर-२, सिल्लेखाना-१,  बंजारा कॉलनी-२, कटकटगेट (शरीफ कॉलनी)- १, एसटी कॉलनी ( कटकट गेट )-२, संजयनगर (बायजीपुरा)- १, गणेश कॉलनी (मोहनलालनगर)-४, वसंत नगर (जवाहर कॉलनी)-१, त्रिमूर्ती चौक (जवाहर कॉलनी)- २, समतानगर -२, पडेगाव-१, रोहिणीनगर-१, न्यायनगर-१, गादिया‍विहार-२, शिवाजीनगर -१, गारखेडापरिसर-३, अशोकनगर (एमआयडीसी, मसनतपूर)-२, व्हीआयपी रोड (काळीवाडा)-१, सिटी चौक-२, युनुस कॉलनी-१, नूतन कॉलनी-१, रवींद्रनगर-१, दशमेशनगर-१, अरिहंतनगर-१, विद्यानगर-१, एन-४ (गुरू साहनीनगर)-१, अंबिकानगर-१, पोलिस कॉलनी (मुकुंदवाडी)-१, एन-६ (सिडको)-१, कैलासनगर-१, रोकडा हनुमान कॉलनी-१, जटवाडा रोड परिसर-१, अन्य १; इंदिरानगर-१,  गादियाविहार-१, रमानगर (क्रांती चौक)-१, नूतन कॉलनी-१, कैसर पार्क-१, गल्ली नं.१८ (संजय नगर, मुकुंदवाडी)-१, समतानगर-१ या भागात बाधित आढळून आले. या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २७ महिला आणि ५२ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद