शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

Coronavirus In Aurangaabd : दुपारपर्यंत जिल्ह्यात १८६ कोरोनाबाधितांची वाढ; दोन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 16:40 IST

मनपा हद्दीतील १६८ , ग्रामीण भागातील १८ रूग्ण

ठळक मुद्देजिल्ह्यात ५०६१ कोरोनामुक्त३२३३ जणांवर उपचार सुरुएकूण कोरोनाबधितांची संख्या ८६५०

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी आणखी १८६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. यात मनपा हद्दीतील १६८ आणि ग्रामीण भागातील १८ रुग्णांचा समावेश आहे. शहातील कोरोनाची साखळी तुटण्यासाठी लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. परंतु तरीही रूग्ण आढळने सुरूच आहे. यासोबतच उपचारादरम्यान दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबधितांची संख्या ८६५० झाली आहे. त्यापैकी ५०६१ बरे झाले असून आतापर्यंत ३५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण ३२३३ जणांवर उपचार सुरु आहेत. नव्याने आढळून आलेल्या ९ रुग्णांची शहर प्रवेशवेळी अँटीजेन टेस्टद्वारे केली असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. औरंगाबादेत १० जुलैपासून लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. त्याचा सोमवारी चौथा दिवस आहे. कोरोनाची साखळी तुटण्यासाठी लॉकडाऊन महत्वपूर्ण आहे. परंतु शहरात दोनशेच्या घरात रूग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यूएन-६, सिडको येथील ४९ वर्षीय पुरुष आणि छावणी येथील ७६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती घाटी प्रशासनाने सोमवारी दिली. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ३५६ झाली आहे. कोरोनामुळे जिल्हात दररोज रुग्णांचा मृत्यू होणे सुरूच आहे. 

मनपा हद्दीतील रुग्ण रमा नगर १, सादात नगर, रेल्वे स्टेशन परिसर २,भावसिंगपुरा १, मयूर पार्क ५, कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर (1), छावणी १, पद्मपुरा ३, एकनाथ नगर ३, शिवशंकर कॉलनी ८, ज्ञानेश्वर कॉलनी १, भानुदास नगर, आकाशवाणी परिसर १, मित्र नगर ४, उत्तरा नगरी, धूत हॉस्पीटलमागे १, अंगुरी बाग १, अरिहंत नगर १, एन सहा सिडको ४, एन चार सिडको १, सेव्हन हिल २, गजानन कॉलनी १, जाधववाडी १, तिरूपती कॉलनी १, विष्णू नगर ४, आयोध्या नगरी २, कांचनवाडी १, चिकलठाणा ३, विवेकानंद नगर, एन बारा हडको १, कोहिनूर गल्ली रोड १, एन नऊ पवन नगर १,एन सात, सिडको १, जय भवानी नगर १, देवळाई चौक, बीड बायपास १, रेणुका नगर, शिवाजी नगर १०, गुरूप्रसाद नगर, बीड बायपास १, जालान नगर १, एसआरपीएफ कॅम्प, सातारा १, जय नगरी, बीड बायपास ३, आयोध्या नगर १३, श्रीकृष्ण नगर २, रायगड नगर १, नारेगाव १, नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी २, उस्मानपुरा १, बजाज नगर ३, अमेर नगर, बीड बायपास १, सातारा परिसर १, गारखेडा १, सातारा परिसर ९, मिल कॉर्नर १, वेदांतनगर २, काका चौक, पद्मपुरा १, नक्षत्रवाडी २, छावणी ४, पद्मपुरा १, कुँवरफल्ली १, इटखेडा ३, पडेगाव १, अशोकनगर, मसनतपूर ८, शिवशंकर कॉलनी ३, सौजन्यनगर १, सारा वैभव, जटवाडा रोड १, एन सहा, सिडको १, एन नऊ,श्रीकृष्णनगर १, जय भवानीनगर १, मुकुंदवाडी १, विठ्ठलनगर १, नागेश्वरवाडी १, उस्मानपुरा १, केसरसिंगपुरा १०, साई बाबा मंदिर परिसर, पद्मपुरा २, एन बारा ३, घाटी परिसर २, चिकलठाणा १, चिंचबन कॉलनी २, मीरा नगर, पडेगाव १ 

ग्रामीण भागातील रुग्णलोनवाडी, सिल्लोड १, दहेगाव, वैजापूर १, वडगाव कोल्हाटी १, गांधी नगर, रांजणगाव १, पांडुरंग सो., बजाज नगर १, अरब मोहल्ला, अजिंठा १, हनुमान नगर, अजिंठा १, रेणुका नगर, अजिंठा २, तेलीपुरा गल्ली १, मातोश्री नगर, रांजणगाव १ , आयोध्यानगर, बजाज नगर १, बजाजनगर १ गेवराई, दौलताबाद १, कुंभार गल्ली, वैजापूर ४.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद