औरंगाबाद : घाटीत उपचार सुरू असतानाबुधवारी पहाटे हिलाल कॉलतील ६० वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाने बळी बळी गेलेल्या रुगांची संख्या ५ वर गेली आहे.
सदर रुग्ण १९ एप्रिल रोजी तीव्र ताप, अंगदुखी, खोकला, डोखेदुखी, दमा, या कारणांमुळे त्यांना घाटीत ऍडमिट करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या शरीरातील ऑक्सिजणचे प्रमाण ६० टक्के कमी झालेले होते. त्याच दिवशीं त्याचा स्वब नमुना घेण्यात आला. सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय कोरोनबाधितास रविवारी (दि.१९) सकाळी ११ वाजता अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तीव्र ताप, अंगदु:खी, खोकला, डोकेदु:खी व दमा या लक्षणांवरून त्यांना कोविड संशयित रुग्ण म्हणून भरती करून घेण्यात आले होते. त्यांना कृत्रीम श्वासावर ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. उपचारादरम्यान दोन्ही बाजूचा न्यूमोनियाबरोबरच इतर विकारांनी प्रकृती खालावल्याने बुधवारी (दि.२२) त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
दरम्यान, ७६ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३६ झाली आहे. त्यापैकी १५ जण बरे होऊन घरे परतले आहेत. तर ७६ वर्षीय महिला, आरेफ कॉलनीतील पुरूषासह आतापर्यंत पाच कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ आणि घाटीत एक अशा एकूण १६ जणांवर उपचार सुरू आहेत.