शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कन्नडमध्ये 'ब्रेक द चैन'ला हरताळ फासणारी ७ दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 16:29 IST

coronavirus : शहरात पोलीस पथकाने आदेशाचा भंग करणाऱ्या जवळपास ४९ दुकानांचे फोटो काढले आहेत. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

कन्नड - शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु 'ब्रेक द चैन' या अंतर्गत लागू असलेल्या निर्बंधांना काही दुकानदारांनी हरताळ फसल्याचे दिसून आले आहे. शासनाच्या आदेशाला न जुमानता छुप्या पध्दतीने दुकाने सुरु ठेवलेली अशी ७ दुकाने आज सील करण्यात आली आहेत.

राज्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'ब्रेक द चैन' या अंतर्गत नियमावली लागू करण्यात आली आहे. यानुसार अटी व शर्थीसह किराणा दुकान, दुध डेअरी आदी अत्यावश्यक सेवेतील दुकाने /आस्थापना, कृषी साहीत्य बी –बियाणेंची दुकाने, मेडीकल हे सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक दुकानदार निर्बंधांचे उल्लंघन करून दुकाने उघडत आहेत. यामुळे उपविभागीय अधिकारी जर्नाधन  विधाते , तहसिलदार  संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे,  प्रभारी मुख्याधिकारी शेख हारून यांच्या सनियंत्रणात तहसील कार्यालय ,पोलीस स्टेशन शहर, नगरपरीषद यांच्या संयुक्त पथकाने अशा दुकानदारांवर कारवाई सुरु केली आहे.  

पथकाने केलेल्या पाहणी शहरातील ७ दुकाने आदेशाचा भंग करून उघड असल्याचे दिसून आले. या सातही दुकानांना पथकाने पुढील आदेश येईपर्यंत सील केले आहे. यामध्ये आकाशदीप कापड दुकान, जॉन डिअर ट्रॅक्टर  एजन्सी, श्रीकृष्ण हार्डवेअर यासह दोन हेअर सलुन व दोन गॅरेज यांचा समावेश आहे. यावेळी त्यांच्याकडून ३ लक्ष ५० हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. 

ही कारवाई अव्वल कारकुन सत्यजीत आव्हाड, मंडळ अधिकारी आबा पाटील,  पी एस आय भुषण सोनार,  तहसील कार्यालयाचे राहुल खंदारे, कुणाल दाभाडे, तलाठी  आशिष सुरपाम, सुनिल कोठावदे, एरंडे, नगर परीषदेचे  निकम, कदम, नारायण कनगरे यांच्या पथकाने केली. दरम्यान, शहरात पोलीस पथकाने आदेशाचा भंग करणाऱ्या जवळपास ४९ दुकानांचे फोटो काढले आहेत. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद