शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : रुग्णालयातील ते १८ दिवस; मौत दो कदम आगे थी; डर था, लेकिन अब मैं खुश हूँ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 08:09 IST

अहमदनगरच्या रुग्णालयातील कक्ष सेवकापासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वांनीच आपल्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणल्याची भावना या व्यक्तीने व्यक्त केली.

ठळक मुद्देकोरोनामुक्त झालेल्या ६३ वर्षीय व्यक्तीशी ‘लोकमत’चा संवादबीड जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन परतला घरी

- सोमनाथ खताळबीड : कुछ लोग आये और नींद में ही उठा के अस्पताल में ले गये. कोरोना के बारे में सुना था. इसलिए दिल मे बहुत डर था. मौत कुछ कदम आगे थी, लेकिन अब मैं ठीकठाक हूँ. इसीलिए मुझे बडी खुशी हो रही है... हे शब्द आहेत कोरोनामुक्त होऊन परतलेल्या पिंपळा येथील ६३ वर्षीय व्यक्तीचे. अहमदनगरच्या रुग्णालयातील कक्ष सेवकापासून ते डॉक्टरांपर्यंत सर्वांनीच आपल्याला मृत्यूच्या दाढेतून परत आणल्याची भावना या व्यक्तीने व्यक्त केली. शुक्रवारी बीड जिल्ह्यात आल्यावर ‘लोकमत’ने त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने १८ दिवसांचा रुग्णालयातील मुक्कामाचा उलगडा केला.

आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील ६३ वर्षीय व्यक्ती अहमदनगर जिल्ह्यात गेला होता. तेथेच त्याचा कोरोनाग्रस्त रुग्णाशी संपर्क आला. त्यानंतर ते दुचाकीवरुन गावी परतले होते. ही माहिती आरोग्य विभागाला समजताच त्यांनी त्याला अहमदनगर येथील बूथ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ७ एप्रिल रोजी त्याचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. त्यानंतर बीड व अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हाच रुग्ण बीड जिल्ह्यातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण होता. १४ दिवसानंतर त्याचे पुन्हा दोनवेळा थ्रोट स्वॅब घेतले असता, दोन्हीही निगेटिव्ह आले. त्यामुळे तो कोरोनामुक्त झाल्याचे घोषित केले. शुक्रवारी सकाळी त्याला रुग्णालयातून सुटी दिल्यानंतर दुपारी तो पिंपळा या गावी परतला. त्यानंतर त्याच्याशी ‘लोकमत’ने फोनवरुन संपर्क साधला. यावेळी त्याने ७ ते २४ एप्रिल दरम्यानचा रुग्णालयातील सर्व प्रवास उलगडला.

तो म्हणतो, मला नेमकीच झोप लागली होती. एवढ्यात मला उठवण्यात आले. एका रुग्णवाहिकेतून अहमदनगरला नेले. तेथे दवाखान्यात दाखल केले. का दाखल केले हे सुरुवातीला माहित नव्हते. नंतर अंदाज काढून कोरोनाची माहिती मिळाली. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आरोग्य विभागाचे सर्वच कर्मचारी काळजी घेत होते. औषधोपचार करण्यासह खाण्यापिण्याची व्यवस्थाही त्यांनीच केली होती. कुटुंबातील सदस्याप्रमाणे ते माझी काळजी घेत होते, असे त्यांनी सांगितले. मृत्यू काही पावलांवर असताना डॉक्टर, कर्मचाºयांनी त्यांना तेथून परत आणले. त्यामुळे आरोग्य विभागाचे कौतूक होत आहे.

हॉस्पिटलमध्येच दररोज नमाज पठनमाझ्या प्रार्थना आणि धार्मिक पूजेला कोणीही बाधा आणली नाही. मी बाजूच्याच खोलीत जावून दररोज नमाज अदा करीत होतो. आता रोजा महिना सुरु होणार आहे. मी घरातूनच नमाज अदा करणार आहे.

कोरोना बहोत बेकार है १८ दिवस रुग्णालयातच राहून उपचार घेणाºया त्या व्यक्तीने अनेक आठवणी मनात साठविल्या आहेत. ‘कोरोना  बहोत बेकार है’ असे म्हणत त्यांनी या विषाणूचे गांभीर्य सांगितले. आता मी घरी परतलो आहे. एवढ्या दिवस कोणाचाच संपर्क नव्हता. आता खुप फोन  येत आहेत. गोळ्या खाल्या आहेत. थोडा आराम करतो. आता काही छोट्या छोट्या गोष्टी आठवत नाहीत. मी फोन ठेवतो, असे म्हणत त्यांनी फोन कट केला. 

पिंपळासह ११ गावे १४ दिवस बंदकोरोनाचा रुग्ण आढळताच पिंपळासह परिसरातील ११ गावे प्रशासनाने बंद केली होती. गुरूवारी ते  पुन्हा खुली केली. दररोज २६२० गावांतील १२ हजार ३४५ लोकांची चौकशी केली जात होती. १४ दिवसांत केवळ दोघांना लक्षणे जाणवली होती. त्यांचे स्वॅब घेतले असता ते देखी निगेटिव्ह आले होते. यासाठी ३० पथकांची नियूक्ती केली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड