शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : मराठवाड्यातील १ हजार कोटींची कामे खोळंबणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 19:17 IST

कोरोनामुळे नव्याने मंजूर झालेल्या तरतुदीवर गदा आली आहे.

औरंगाबाद : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी  जानेवारी महिन्यात मराठवाड्यासाठी नियोजन म्हणून घोषित केलेल्या २ हजार ६४ कोटींपैकी १ हजार कोटींची कामे कोरोनामुळे निर्माण  झालेल्या आर्थिक आणीबाणीमुळे खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

विकासकामांसाठी राज्यात ३३ टक्केच निधी उपलब्ध करण्याच्या आदेशामुळे विभागातील नवीन कामांसाठी मंजूर केलेला निधी राज्याची आर्थिक घडी पूृर्णपणे बसल्यानंतरच मिळण्याची शक्यता आहे; परंतु येणाऱ्या काळात हा निधी कधी मिळेल, हे निश्चित नाही.

मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतील विविध विकासकामे करण्यासाठी शासनाकडून जिल्हानिहाय अपेक्षित निधी देण्यात येतो. संबंधित निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रस्तावित कामांवर खर्च होत असून, २०१९-२० मध्ये मराठवाड्याला प्राप्त झालेल्या निधीपैकी ६,३Þ २० टक्के खर्च झाला होता. 

ही विभागाची परिस्थिती असताना कोरोनामुळे नव्याने मंजूर झालेल्या तरतुदीवर गदा आली आहे. १ एप्रिल २०२० हे वित्तीय वर्ष सुरू झाले  कोरोनाच्या फेऱ्यातच. त्यामुळे बहुतांश तरतुदींवर खर्च प्राधान्याने आरोग्य व्यवस्थेकडे वळविण्यात आला आहे. परिणामी, इतर कामांना ब्रेक लागणार, हे निश्चित आहे.

४ मे रोजीचा शासनादेश काय सांगतो४ मे २०२० रोजी शासनाच्या वित्त विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या अध्यादेशात असे म्हटले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. त्या अनुषंगाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत ज्या योजना सुरू आहेत, त्यांचे महत्त्व पाहून निर्णय घेण्यात यावा. अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार ३३ टक्के निधी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात यावे. नवीन कोणतीही योजना प्रस्तावित केली जाऊ नये. तसेच नवीन कुठलीही खरेदी, बांधकामे करू नयेत. खर्चाचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा. देयके अदा करण्याबाबत बंधने आणावीत, अशा काही सूचना ४ मे च्या आदेशात वित्त विभागाने केल्या आहेत.

सन २०१९-२० आणि२०२०-२१ चे नियोजनजिल्हा     गतवर्षी     यंदाऔरंगाबाद     १७२     ३२५जालना     १२६     २३५परभणी     ९२     २६२बीड     १५०     ३००नांदेड     १६२     ३१५हिंगोली     ६२     १०१ लातूर     १३९     २४०उस्मानाबाद     १४८     २८६एकूण     १,०५१     २,०६४ 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEconomyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसाय