शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : औरंगाबादमधील ‘ऑटो’ उद्योगाला ‘कोरोना’ची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:59 IST

येत्या १५ दिवसांत चीन पूर्वपदावर नाही आले, तर आगामी काळ उद्योग विश्वाला अडचणीचा ठरू शकेल.

ठळक मुद्दे२० टक्के उत्पादन घसरण्याचा धोकाचीनमधील कच्चामाल पुरवठा करणारी साखळी सध्या ठप्प उलाढालीवरही परिणाम शक्य 

- विकास राऊत

औरंगाबाद : चीनमध्ये उद्भवलेल्या ‘कोरोना’च्या साथीचा फटका औरंगाबादेतील स्वयंचलित वाहन (ऑटो) उद्योगांना बसला आहे. आजच्या परिस्थितीत उत्पादनात २० टक्के घट होईल, असा अंदाज आहे. स्वयंचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणारे औरंगाबाद देशामधील प्रमुख केंद्र आहे. 

चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालावर येथील उद्योग आणि उत्पादन अवलंबून असल्याने चीनमध्ये कोरोना साथीमुळे उद्योगांची झालेली पडझड कच्च्या मालाच्या पुरवठ्यावर परिणाम करणारी ठरली. चीनमधून जहाज वाहतुकीद्वारे होणारा पुरवठा खंडित झाला असून, अशा पुरवठ्यांवर निर्बंध आल्यामुळे औरंगाबादेतील उत्पादनात घट झाली. परिणामी, उत्पादनाचे लक्ष्य गाठणे कठीण होण्याची शक्यता आहे. वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वस्टेशन, पैठण या प्रमुख औद्योगिक वसाहती औरंगाबादमध्ये आहेत.

सीएमआयएचे माजी अध्यक्ष प्रसाद कोकीळ यांनी सांगितले, चीनमधील कच्चामाल पुरवठा करणारी साखळी सध्या ठप्प पडलेली आहे. बी-६ वाहनांचे उत्पादन आता उंबरठ्यावर आहे. व्हेंडरमध्ये एमएसएमई सेक्टरमधील जे उद्योग आहेत, ते ज्यांचे पुरवठादार आहेत, त्या बड्या उद्योगांकडील स्टॉक सध्या असेल, तर काही जास्त परिणाम नाही होणार; परंतु बड्या उद्योगांकडील स्टॉक संपत आला, तर त्यांचे उत्पादन कमी होईल. त्याचा फटका एमएसएमईला बसू शकेल. येत्या १५ दिवसांत चीन पूर्वपदावर नाही आले, तर आगामी काळ उद्योग विश्वाला अडचणीचा ठरू शकेल. मसिआचे माजी अध्यक्ष किशोर राठी म्हणाले, उद्योग वर्तुळात सध्या चिंतेचे वातावरण आहे. सप्लाय चेनवर परिणाम होत आहे. कृषी उद्योगांना लागणारे रसायन चीनमधून मोठ्या प्रमाणात आयात होते. सप्लाय चेन बंद असल्याने त्या उद्योगांनादेखील फटका बसण्याची शक्यता आहे. 

१० ते २० टक्के उद्योगांवर परिणाम कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीचे विभागीय अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी सांगितले, १० ते २० टक्के उद्योग विश्वांवर परिणाम होईल. आॅटोमोबाईल आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रामुख्याने प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनअम कच्चा मॉल, आॅटोमोटिव्हसाठी लागणारे पार्टस् ज्यामध्ये लघु व मध्यम दर्जातील पार्टस् ज्यांचा जास्त उत्पादनासाठी वापर होतो. या उत्पादनांची चीनमध्ये मोठी उत्पादन साखळी आहे. ते औरंगाबादमधील मुख्य स्रोत आहेत. लघु व मध्यम उद्योगांना फटका बसणे शक्य आहे. कच्चामाल घेण्यासाठी आम्ही चीनवर अवलंबून नाही; परंतु माझे जे ग्राहक आहेत, त्यांना लागणारा कच्चा माल चीनमधून येतो. त्यामुळे त्यांचे उत्पादन कमी झाल्याने माझे उत्पादन कमी झाले आहे. दोन आव्हाने आहेत; पण त्यातून फायदा पाहणे गरजेचे आहे. आपल्याकडे जे पार्टस् आयात होतात. ते भारतातही उत्पादित होतात; परंतु संख्या आणि किमतीवर आपण ते उत्पादित करीत नाहीत. स्थानिक पातळीवरील उत्पादकांना आता संधी आहे. दोन ते पाच आठवड्यांसह दोन महिन्यांपर्यंत वेळ देऊन आपण सक्षम होऊ शकतो. दोन ते पाच टक्के पार्टस् सोडले, तर भारतात उत्पादन साखळी आहे. सद्य:स्थितीत साधारणत: १० ते २० टक्के परिणाम झाला आहे. 

औरंगाबादचे उद्योगविश्व असे : - 5 वसाहती; 4,000 उद्योग- चीनकडून येणारा कच्चा माल 27 %; 2,000 एमएसएमई उद्योग- 3 लाख रोजगार; 15 दिवसांनंतरच चित्र होणार स्पष्ट

टॅग्स :AutomobileवाहनAurangabadऔरंगाबादWaluj MIDCवाळूज एमआयडीसीChikhalthana MIDCचिखलठाणा एमआयडीसीShendra MIDCशेंद्रा एमआयडीसीcorona virusकोरोना वायरस बातम्या