शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कहर : मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने मराठवाड्यात प्रशासन मेटाकुटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:30 IST

घाटीतून काही डॉक्टरांची टीम मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाठविण्यात आली आहे.

ठळक मुद्देविभागात २९ हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. लातूरमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहेहिंगोली, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांत कोरोना वाढत आहे

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मराठवाड्यातील प्रशासकीय यंत्रणा मेटाकुटीला आली आहे. त्यातच हिंगोलीतील जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने यंत्रणा हवालदिल झाली असून, आरोग्य सुविधांसह मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोर आव्हान उभे आहे.

विभागात २९ हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे. लातूरमध्ये सध्या लॉकडाऊन सुरू आहे, तर बीड जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाऊन लागू होणार आहे. तसेच हिंगोली, परभणी, उस्मानाबाद जिल्ह्यांत कोरोना हातपाय पसरतो आहे. खाजगी हॉस्पिटल्स स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार नाहीत. डॉक्टर्स स्वेच्छा निवृती मिळावी, यासाठी अर्ज करू लागले आहेत. औषधींचा तुटवडा जाणवू लागला आहे. उस्मानाबादमध्ये डॉक्टर्स नाहीत. घाटीतून काही डॉक्टरांची टीम मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाठविण्यात आली आहे. यासारखी अनेक प्रकरणे असून, प्रशासन हवालदिल होत चालले आहे. लोकप्रतिनिधी विभागीय प्रशासनाकडे लॉकडाऊन करण्याबाबत मागणी करीत आहेत; परंतु कोरोनावर लॉकडाऊन, संचारबंदी हा उपाय नसल्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊनबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. चेकपोस्टवरून रोज १०० च्या आसपास नागरिक येत आहेत. त्यातील पॉझिटिव्ह रुग्ण कोरोना प्रसारक आहेत. सहा महिन्यांपासून आरोग्य यंत्रणेसह सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोना नियंत्रणाच्या कामात आहे.

अँटिजन कीटस्चा तुटवडाकंटेन्मेंट झोनमध्ये टेस्टिंंग वाढविण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या; परंतु अँटिजन टेस्ट कीटस्चा तुटवडा निर्माण झाला आहे. कीटसचा पुरवठा लवकरच होईल. जिल्हानिहाय कीटस पुरवठ्याबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहे, असा दावा प्रशासनाने केला.

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणीचा आढावा घेतला आहे.  उपलब्ध सुविधांच्या तुलनेत विभागातील यंत्रणेने प्रचंड परिश्रम घेत कोरोनाशी दोन हात केले आहेत. पूर्ण विभागाचा आढावा घेतला असून, खाजगी हॉस्पिटल्सशीदेखील बोलणे सुरू आहे.

टॅग्स :Marathwadaमराठवाडाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद