शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीचा कोरोनामुळे खर्च वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:37 IST

१८ जानेवारीपर्यंत लसीकरण मोहिमेचे शेड्युल्ड ठरविण्यात जिल्हा प्रशासनाची धावपळ होणार आहे.

ठळक मुद्दे१५ डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना निघाली आहे.६१८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  ग्रामपंचायतीची निवडणूक होणार असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दावा केला की, या निवडणुकीत देखील पदवीधर निवडणुकीप्रमाणे काळजी घेतली जाणार आहे. निवडणुकीचे व्यवस्थापन तहसील पातळीवर असते, त्यामुळे निवडणुकांचा तालुकानिहाय प्रोटोकॉल ते पाहतील. जिल्हाधिकारी म्हणून सर्व सूचना आणि मार्गदर्शन केल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील ६१८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान आणि १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. ११ डिसेंबरपासून आचारसंहिता लागू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ७ ग्रामपंचायतींच्या तसेच  डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या ६११, अशा एकूण ६१८ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १८ जानेवारीपर्यंत लसीकरण मोहिमेचे शेड्युल्ड ठरविण्यात जिल्हा प्रशासनाची धावपळ होणार आहे. शासकीय यंत्रणा निवडणूक कामात अडकलेली असेल, सोबतच लसीकरण मोहीम देखील राहणार आहे. 

प्रशिक्षण देणार१५ डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी अधिसूचना निघाली आहे. शासकीय कला महाविद्यालय येथून मतदान यंत्र तहसील पातळीवर कंटनेरमधून पोहोचविण्यात आले. ग्रामपंचायतीच्या गरजनेनुसार ईव्हीएम देण्यात येणार आहेत. अधिसूचनेनंतर मतदान केंद्र, सुरक्षित अंतरासाठी मार्किंग, सॅनिटायझर आदी बाबींबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतAurangabadऔरंगाबादsarpanchसरपंचElectionनिवडणूक