शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
2
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
5
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
6
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
7
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
8
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
9
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
10
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
11
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
12
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
13
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
14
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
15
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
16
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
17
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
18
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
19
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

रात्रंदिवस रुग्णसेवा देणारे कोरोना योद्धेच वेतनाविना, मार्चचे वेतन अद्याप नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 12:10 IST

जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन अजूनही झालेले नाही.

ठळक मुद्दे फेब्रुवारीत आयकर कपातीमुळे वेतन कमी मिळाले, तर मार्चचे वेतन मिळालेच नाही.गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावात कोरोना योद्धे डाॅक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस रुग्णांसाठी कार्यरत आहेत. पण या कोरोना योध्द्‌यांनाच सध्या आर्थिक अडचणीला सामाेरे जावे लागत आहे. एप्रिल महिना संपत आला, तरी अद्यापही त्यांचे मार्चचे वेतन झालेले नाही. ही परिस्थिती फक्त औरंगाबाद जिल्ह्याची नाही, तर संपूर्ण मराठवाड्यातील आरोग्य विभागातील कोरोना योद्धे आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन अजूनही झालेले नाही. वेतनासाठी कर्मचारी, संघटना वारंवार पाठपुरावा करीत आहेत. परंतु लवकरच वेतन होईल, बजेट येईल, असे सांगण्यापलीकडे काहीही उत्तर मिळत नसल्याची स्थिती आहे. जिल्हा रुग्णालय हे नवीनच आहे. येथील पदांना कन्ट्युनेशन मिळणे, बजेटला मान्यता मिळणे बाकी असल्याने वेतन थांबल्याचे सांगितले जाते. फेब्रुवारीत आयकर कपातीमुळे वेतन कमी मिळाले, तर मार्चचे वेतन मिळालेच नाही. एप्रिल महिनाही संपत आला आहे. शासकीय डाॅक्टर असल्याने एक्‌-दोन महिन्यांचे वेतन झाले नाही तर काही फरक पडत नाही, असा अनेकांचा समज असेल. पण गेल्या दोन महिन्यांपासून आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. बँकेचा हप्ताही हुकला, असे काही डाॅक्टरांनी सांगितले.

राज्यस्तरावरील बाबआर्थिक वर्षातील पहिला महिना आहे. वेतन ही राज्यस्तरावरील बाब आहे. पण आगामी काही दिवसांत वेतन होऊन जाईल, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे म्हणाले.

आर्थिक अडचणवरिष्ठांसोबत आमचे वेतनासंदर्भात बोलणे झाले आहे. आगामी दोन ते तीन दिवसात वेतन होईल, असे सांगण्यात आले आहे. बजेट कन्ट्युनेशन झाले नसल्याने वेतन झालेले नाही. फेब्रुवारीत आयकर कपात होऊन वेतन दिलेले आहे. त्यात आता मार्चचे वेतन नाही, एप्रिलही संपत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ही स्थिती संपूर्ण मराठवाड्यात आहे.- डाॅ. संदिपान काळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद