शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : आत्मशक्तीचा विजय; ९४ वर्षीय सुरजाबाईंनी केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 16:21 IST

Corona Virus : श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या. लगेच २५ एप्रिल रोजी त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देजेव्हा त्या घरी आल्या होत्या त्यावेळी घर दिवाळीसारखे सजविण्यात आले होते.सुनांनी सासूबाईंचे औक्षण केले. नातवंडांनी त्यांच्या गळ्यात हार घातला.

औरंगाबाद : शहरातील वेदांतनगरात राहणाऱ्या ९४ वर्षीय सुरजाबाई रतनलाल जैन यांनी जगण्याची जिद्द, आत्मशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली. सोमवारी रात्री हॉस्पिटलमधून त्या घरी आल्या तेव्हा त्यांची मुले, सुना, नातवंडे यांनी जल्लोषात स्वागत केले. आपल्या घरात, परिवारात आल्यामुळे आजीबाईंचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरून तो ओसंडून वाहत होता.

त्या माजी नगरसेवक विकास जैन यांच्या आई आहेत. सुरजाबाईंचा ४ मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या. लगेच २५ एप्रिल रोजी त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वय ९४ वर्षे, वजन अवघे ३५ किलो वजन असल्याने डॉक्टरांसाठी हे एक आव्हान होते. मात्र, सुरजाबाईंनी प्रबळ आत्मशक्ती व सकारात्मक विचारांमुळे कोरोनावर मात करून आपले घर गाठले. जेव्हा त्या घरी आल्या होत्या त्यावेळी घर दिवाळीसारखे सजविण्यात आले होते. अंगणात सुरेख रांगोळी रेखाटण्यात आली होती. दिव्यांचा झगमगाट करण्यात आला होता. त्यांचे आवडते कृष्णाचे भजन लावण्यात आले होते. सुनांनी सासूबाईंचे औक्षण केले. नातवंडांनी त्यांच्या गळ्यात हार घातला. असे आनंदी वातावरण निर्माण झाले. कोरोनावर मात करून सुखरूप माझ्या घरी आले, माझी मुले, सुना, मुलगी, नातवंडांत आल्याने त्यांना आभाळ ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते.

विकास, आता मी बरी आहे ना !सुरजाबाई मंगळवारी सकाळी मुलगा विकास यांना म्हटल्या की, ‘विकास मी बरी आहे ना !’ हे आईचे वाक्य एकूण विकास यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू वाहू लागले. ‘आई तू एकदम ठणठणीत आहे’, असे त्यांनी सांगितले. तेव्हा आईच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून सर्वजण सुखावले. तो क्षण माझ्या व परिवारासाठी अनमोल होता, असे विकास जैन यांनी सांगितले.

आजीबाईंना आवडतो आमरससुरजाबाई यांना आमरस सर्वाधिक आवडतो. हॉस्पिटलमध्ये असतानाही त्यांनी आमरसाचा आस्वाद घेतला. याशिवाय टीव्ही मालिका त्या पाहतात. त्यातल्या त्यात ‘रामायण’ व ‘महाभारत’ ह्या संपूर्ण मालिका त्यांनी पाहिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद