शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोरोनाचा उगम मासळी बाजारातून नव्हे, तर बायो वेपनमुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 18:34 IST

चीनमध्ये या कोरोनामुळे ७० हजार कंपन्या बंद पडलेल्या आहेत.

ठळक मुद्देचीन १९९३ पासून गुपचूप बायो वेपन तयार करीत आहेहे वेपन भारताविरुद्ध वापरले जाण्याची शक्यता

औरंगाबाद : चीनच्या मासळी बाजारातून कोरोना व्हायरस झाला, असे सांगितले जात असले तरी चीन १९९३ पासून गुपचूप बायो वेपन तयार करीत होता, त्या लॅबमधून कोरोनाचा व्हायरस पसरला असल्याचे खळबळ जनक प्रतिपादन आंतरराष्ट्रीय धोरणाचे प्रसिद्ध अभ्यासक शरद देवळाणकर यांनी केले. 

जीवन विकास ग्रंथालयाच्या ४७ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘मोदींचे परराष्ट्र  धोरण : सातत्य, स्थित्यंतर आणि आव्हाने’ यावर ते बोलत होते. ग्रंथालयाचे अध्यक्ष माजी न्या. अंबादास जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. श्रीकांत उमरीकर यांनी सूत्रसंचालन केले व आभारही मानले. यावेळी प्रश्नोत्तरेही रंगली.

पुढे बोलताना ते म्हणाले, चीन १९९३ पासून गुपचूप बायो वेपन तयार करीत होता, त्या लॅबमधून कोरोनाचा व्हायरस पसरला, हे वेपन कुणाविरुद्ध वापरला जाऊ शकले असते, तर अर्थातच भारताविरुद्ध. चीनमध्ये या कोरोनामुळे ७० हजार कंपन्या बंद पडलेल्या आहेत. मात्र, ते हे जाहीर करीत नाहीत. या कंपन्या बंद पडल्यामुळे आणि चीनच्या स्वस्त वस्तू भारतात येणे बंद झाल्यामुळे महागाई वाढणार, हे निश्चित. ५७ अब्ज डॉलर्सच्या वस्तू भारत चीनकडून खरेदी करत असल्याचेही त्यांनी सांगितले

चीनच्या पलीकडे आपली परराष्ट्रनीती जात नाहीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे निदान परराष्ट्र धोरणावर चर्चा तरी सुरू झाली. नाही तर आपली परराष्ट्र धोरणाबद्दलची रुची पाक-चीनच्या पुढे जात नाही. मोदींनी आतापर्यंत ८२ देशांचे दौरे केले. दौऱ्यांच्या फलश्रुतीपेक्षा खर्च किती झाला यावरच चर्चा जास्त होते. भारतात परराष्ट्र धोरणाचे लोकशाहीकरण झाले नाही. ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, याबद्दलची खंत देवळाणकर यांनी व्यक्त केली. 

मोदींच्या दौऱ्यांमुळे ३२० अब्ज डॉलर्स भारतात २०१४ ते २०२० यादरम्यान मोदींनी केलेल्या परदेश दौऱ्यांवर ४४६ कोटी रु. खर्च झाले. अमेरिका- रशियाच्या प्रमुखांच्या १० टक्केही दौरे मोदी करीत नाहीत. मागील पाच वर्षांत मोदींच्या दौऱ्यांमुळे ३२० अब्ज डॉलर्स भारतात आले. त्या तुलनेत दौऱ्यांवर झालेला खर्च नगण्यच आहे, असे  त्यांनी नमूद  केले. आण्विक उत्तरदायित्व विधेयक संसदेत संमत होत नाही तोपपर्यंत भारतात न्युक्लिअर प्लँट लागणार नाहीत, असेही ते म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादchinaचीन