शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : ना रुग्णसंख्या लपवली ना मृत्यू, महाराष्ट्र प्रामाणिक राज्य : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 15:25 IST

Subhash Desai on Corona Virus Death Numbers राज्यातील विविध जिल्ह्यांनी कळविलेल्या दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मृत्यूसंख्याची आरोग्य विभागाने जाहीर केलेली एकूण आकडेवारी आणि आयसीएमआरच्या पोर्टलवरील नोंद यामध्ये तफावत आढळून येत आहे.

औरंगाबाद : कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत तफावत आढळून आली आहे, हे आम्ही प्रामाणिकपणे मान्य केले आहे. महाराष्ट्र राज्य प्रामाणिक आहे. ना कोरोना रुग्णसंख्या ना मृत्युसंख्या लपवली. रुग्णांचा कोरोना अहवाल येण्यापूर्वी मृत्यू झाल्याने त्याची नोंद राहून गेल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील विविध जिल्ह्यांनी कळविलेल्या दैनंदिन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मृत्यूसंख्याची आरोग्य विभागाने जाहीर केलेली एकूण आकडेवारी आणि आयसीएमआरच्या पोर्टलवरील नोंद यामध्ये तफावत आढळून येत आहे. जाहीर केलेली आणि पोर्टलवरील आकडेवारीत कोरोना रुग्ण आणि मृत्यूसंख्या यात मोठा फरक आढळून आल्याने मृत्यूदर कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप होत आहेत. यावर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, राज्याने कधीच आकडेवारी लपवली नाही. राज्य प्रामाणिकपणे काम करत आहे. सुरुवातीला कोरोना चाचणीचा अहवाल उशिरा मिळत असे, दरम्यानच्या काळात रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याची नोंद तत्कालीन लक्षणानुसार दुसऱ्या आजाराने मृत्यू झाल्याची करण्यात आली. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरी तशी नोंद घेणे राहिल्याने मृत्यूच्या आकड्यात तफावत आढळून येत आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ज्यांचा मृत्यूनंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे त्याची कोरोना मृत्यू म्हणून नोंद करण्याचे आदेश दिले. यामुळे आकडेवारी लपवली नसून योग्य नोंद झाली नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. 

महापालिका निवडणुका ६ महिन्यानंतर महापालिका निवडणूक होणार आहेत. निवडणूक आयोगाने बैठक घेऊन निवडणुका यापुढे वेळेत होतील. त्याची तयारी आहे. राज्य शासनाची चर्चा करून निवडणूक आयोग निर्णय घेईल. येत्या ६ महिन्यात निवडणुका घेण्यात येतील अशी शक्यता आहे. मात्र, कोरोनाचे संकट अजून संपलेले आहे. यामुळे निवडणुकीबद्दल निश्चित सांगण्यात येणार नाही असेही देसाई यावेळी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यूSubhash Desaiसुभाष देसाई