शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

नवे आव्हान ! कोरोनाच्या रुग्णांत घट झाल्याने दिलासा; मात्र गंभीर रुग्णांच्या वाढीने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 12:55 IST

corona virus in Aurangabad : दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाणही चिंताजनक ठरत आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागानुसार २ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरजआयसीयू बेड रुग्णांनी भरलेएकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही

औरंगाबाद : जिल्ह्यात १५ एप्रिलपासून दररोज निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे; पण सध्या कोरोनाने गंभीर रूप घेतल्याची परिस्थिती आहे. कारण दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. परिणामी, जिल्ह्यात एकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही, तर आयसीयू बेडही रुग्णांनी भरले आहेत. व्हेंटिलेटर रिकामे होण्याची वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ रुग्णांवर ओढवत आहे.

जिल्ह्यात एक लाखावर रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या १४ हजारांच्या घरात आली आहे; पण आरोग्य यंत्रणेपुढे नवे आव्हान उभे राहत आहे. दररोज निदान होणाऱ्या रुग्णांत व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असलेल्या रुग्णांचे प्रमाणही चिंताजनक ठरत आहे. आरोग्य विभागानुसार २ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची गरज असते; परंतु जिल्ह्यातील गंभीर रुग्णांच्या संख्येपुढे व्हेंटिलेटरची संख्या अपुरी पडत आहे. कारण एका व्हेंटिलेटरवर एक रुग्ण किमान १० ते १५ दिवस असतो. त्यात रोज गंभीर रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत व्हेंटिलेटरशिवाय रुग्णांवर उपचार करण्याचे आव्हान डाॅक्टरांपुढे उभे राहत आहे. आयसीयू बेडही रुग्णांनी भरून गेले आहेत. दुसरीकडे सौम्य स्वरूपातील, तसेच लक्षणे नसलेल्या रुग्णांचे आयसोलेशन बेड ५० टक्क्यांवर रिक्त आहेत. त्यामुळे आता गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा वाढविण्याची गरज आहे.

घाटीत ४९४ गंभीर रुग्णघाटी रुग्णालयात सध्या तब्बल ४९४ रुग्ण गंभीर आहेत. याठिकाणी आयसीयू, व्हेंटिलेटरची व्यवस्था वाढविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत; परंतु खाजगी रुग्णालयांत व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नातेवाईक सर्वत्र भटकंती करून शेवटी घाटीत येत असल्याची स्थिती आहे.

२ टक्के रुग्णांनाच गरज१० मेपासून कोरोनाची संख्या कमी होईल, अशी परिस्थिती आहे. शंभर रुग्णांत २ टक्के रुग्ण असे असतात, त्यांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची गरज असते. तब्बल ८५ टक्के रुग्णांना लक्षणे दिसून येत नाहीत.- डाॅ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक

बहुतांश रुग्णांना हवा ऑक्सिजनसध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे; पण जे रुग्ण आढळत आहेत, त्यातील बहुतांश जणांना ऑक्सिजन लागत असल्याची स्थिती आहे. पहिल्या लाटेत खाटा वाढविण्यात आल्या, तर ऑक्सिजनची सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे.- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्ह्यातील स्थिती : आयसीयू बेड-६३७रिक्त आयसीयू बेड-८८व्हेंटिलेटर-३०५रिक्त व्हेंटिलेटर- ०आयसोलेशन बेड-४,७२४रिक्त आयसोलेशन बेड-२,५६९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद