शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : चार महिन्यांनंतर सर्वांत कमी कोरोनाबाधितांची नोंद; जिल्ह्यात ९४ रुग्णांची भर, २२३ जणांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 12:39 IST

शहारात २०, तर ग्रामीण भागात ७४ रुग्णांची भर पडली.

ठळक मुद्देउपचारादरम्यान ७ बाधितांचे मृत्यू सध्या जिल्ह्यात १५९३ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस कमी होत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे. चार महिन्यांनंतर सोमवारी सर्वांत कमी बाधितांची नोंद झाली. दिवसभरात केवळ ९४ रुग्ण आढळून आले, तर उपचार पूर्ण झाल्याने २२३ जण घरी परतले. सात बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिह्यात १,५९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहारात २०, तर ग्रामीण भागात ७४ रुग्णांची भर पडली. तर अनुक्रमे १४ व २०९ रुग्णांना सुटी झाली. आजपर्यंत १ लाख ४४ हजार ७८८ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. आतापर्यंत १ लाख ३९ हजार ८४६ जण कोरोनामुक्त झाले असून एकूण ३,३४९ जणांचा मृत्यू झाला. सध्या ग्रामीण मधील १,४४७, तर शहरातील केवळ १४६ अशा १,५९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीणमध्ये सर्वांत कमी सिल्लोड तालुक्यात केवळ १, तर सोयगाव तालुक्यात चार सक्रिय रुग्ण असून, सर्वाधिक वैजापूर तालुक्यात ४४४, औरंगाबाद तालुक्यात २८७, गंगापूर तालुक्यात २१८ रुग्ण असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

मनपा हद्दीत २० रुग्णसातारा परिसर १, घाटी १, शकुंतलनगर १, चिकलठाणा १, एन-१ येथे १, मयूरपार्क १, नॅशनल कॉलनी १, रिलायन्स मॉलजवळ १, त्रिमूर्ती चौक १, अन्य ११.

ग्रामीण भागात ७४ रुग्णऔरंगाबाद तालुक्यात २, फुलंब्रीत १, गंगापूर ५, कन्नड १७, खुलताबाद २, सिल्लोड २, वैजापूर १५, पैठण २७, तर सोयगाव तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही.

सात बाधितांचे मृत्यूघाटी रुग्णालयात चारनेर येथील ४२ वर्षीय पुरुष, तलवाडा येथील ७० वर्षीय महिला, कोऱ्हाळा तांडा येथील ७४ वर्षीय पुरुष, बिसमिल्ला काॅॅलनी येथील ५० वर्षीय पुरुष, लासूरगाव येथील ८२ वर्षीय पुरुष, खासगी रुग्णालयात एन-२ सिडको येथील ५९ वर्षीय पुरुष, सराफारोड येथील ७१ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. म्युकरमायकोसिससह मधुमेह रक्तदाब लठ्ठपणा या सहविकृती असलेल्या भुसावळ येथील ५३ वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद