शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

Corona Virus : एक उमदा, होतकरू डॉक्टर गमावला; ऊसतोड मजुराच्या मुलाची कोरोनाशी झुंज अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 19:42 IST

Corona Virus : इंटर्न म्हणून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देत असताना झाली कोरोनाची लागण

ठळक मुद्देडॉ. राहुल पवार याची दाखल झाल्यापासून प्रकृती गंभीर होती. उपचार सुरु असताना त्यास म्युकरमायकोसिसचेही निदान झाले होते.

औरंगाबाद : ऊसतोड मजुराच्या डॉक्टर मुलाची कोरोनाशी जवळपास महिनाभरापासूनची झुंज आज अपयशी ठरली. कोविडयोद्धा डॉ. राहुल पवारला रुग्णांवर उपचार करतांना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर त्याच्यावर १ मे पासून औरंगाबाद येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. येथेच आज दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

परभणी जिल्ह्यातील आनंदनगर तांडा (ता. पाथरी) येथील ऊसतोड मजुराच्या कुटुंबात राहुल पवारचा जन्म झाला. लातूर येथील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर तो तेथेच इंटर्न म्हणून कोविड वॉर्डात रुग्णसेवा देत होता. याचदरम्यान त्याच्याभोवती कोरोनाने कधी फास आवळला ते त्यालाही कळले नाही. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याची प्रकृती अधिक गुंतागुंतीची झाली. त्याच्या मित्रांनी त्याला १ मेला औरंगाबादेतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, दिवसेंदिवस त्याची प्रकृती गंभीर होत गेली. कोरोनाला हरवून तो येईल, अशी आशा होती. परंतु नियतीला ते मान्य नव्हते. बुधवारी दुपारी ३.१५ मिनिटाने डॉ. राहुल पवार याने या जगातून कायमचा निरोप घेतला. ही माहिती कळताच कुटुंबिय, मित्रपरिवाराला एकच धक्का बसला.

राहुलच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्यामुळे सुरुवातीला त्याच्या सहकारी मित्रांनीच पैसे गोळा करून उपचार व औषधींचा खर्च भागविला. दिवसेंदिवस त्याची प्रकृती गंभीर होत असल्याने दवाखान्याचा खर्च लाखोंच्या पटीत चालला. त्यामुळे मित्रांनी समाजमाध्यमांवर राहुलच्या उपचारांच्या खर्चासाठी मदतीचे आवाहन केले. अनेक दानशुरांनी मदतीचा हात दिला. दरम्यान, एमजीएम रुग्णालयाने राहुलवर मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला. उपचारासाठीचे घेतलेली रक्कमसुद्धा रुग्णालयाने परत केली. राहुल पवार या होतकरू डॉक्टरच्या प्रकृतीविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने हेदेखील नियमितपणे एमजीएम हॉस्पिटलच्या संपर्कात होते.

प्रकृती होती गंभीरडॉ. राहुल पवार याची दाखल झाल्यापासून प्रकृती गंभीर होती. १६ मेपासून तो व्हेंटिलेटरवर होता. दरम्यान उपचार सुरु असताना त्यास म्युकरमायकोसिसचेही निदान झाले होते. त्याचेही उपचार सुरु होते. इंजेक्शन देण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असताना बुधवारी दुपारी मृत्यू झाला, अशी माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. राघवन यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूdoctorडॉक्टर