शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

Corona Virus : औरंगाबाद जिल्ह्यात १८५ कोरोना रुग्णांची वाढ, १८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 12:19 IST

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ७४ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

ठळक मुद्दे उपचारानंतर ३६१ जणांना सुटी ३,०२३ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा दोनशेच्या उंबरठ्यावर गेली. दिवसभरात १८५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ७७, तर ग्रामीण भागातील १०८ रुग्णांचा समावेश आहे. मृत्यूचा आकडाही पुन्हा दहावर गेला. गेल्या २४ तासात जिल्ह्यातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ३ हजार २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४३ हजार ७४ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३६ हजार ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,२२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १२४ आणि ग्रामीण भागातील २३७, अशा ३६१ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना फुलंब्रीतील ६० वर्षीय महिला, मांडवा येथील ६५ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील १० वर्षीय मुलगी, फुलंब्रीतील ६५ वर्षीय पुरुष, धूपखेडा, पैठण येथील ६२ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६३ वर्षीय पुरुष, तसेच ४४ वर्षीय पुरुष, जडगाव येथील ८० वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील ६५ वर्षीय पुरुष, मयूरपार्क येथील ८० वर्षीय महिला, जटवाडा रोड, सवेरा पार्क येथील ५२ वर्षीय पुरुष, आकाशवाणी परिसरातील ६७ वर्षीय पुरुष, जवाहर काॅलनीतील ७४ वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७५ वर्षीय महिला, ५२ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय पुरुष, बीड जिल्ह्यातील ६० वर्षीय पुरुष, नाशिक जिल्ह्यातील ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद २, सातारा परिसर १, बीड बायपास ५, मेल्ट्रॉन २, घाटी २, केसरसिंगपुरा, कोकणवाडी १, पहाडसिंगपुरा २, विशालनगर १, ईटखेडा १, एन-६ येथे ३, मयूर पार्क २, पडेगाव १, नागेश्वरवाडी १, समर्थनगर १, एन-१३ येथे १, एन-९ येथे १, जटवाडा रोड १, हर्सूल ३, न्यु हनुमाननगर १, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पिटलजवळ १, न्यू एस.टी. कॉलनी १, म्हाडा कॉलनी, एन-२ सिडको ३, संघर्षनगर २, अंबिकानगर, हर्सूल ३, काबरा नगर गारखेडा २, हर्सूल जेल (एमसीआर ) १, मारुतीनगर १, त्रिमूर्ती चौक १, अशोकनगर १, आंबेडकरनगर १, नक्षत्रवाडी २, कांचनवाडी १, हनुमाननगर १, गजानननगर ३, छत्रपतीनगर १, उल्कानगरी २, बजाज हॉस्पिटलमागे १, न्यायनगर १, पुंडलिकनगर १, बाबा पेट्रोल पंप १, राजाबाजार १, खडकेश्वर १, नंदनवन कॉलनी १, एन-८ येथे १, शिवनेरी कॉलनी १, देवळाई परिसर १, शामवाडी १, देवळाई चौक १, प्राईड टाऊन, वेदांतनगर १, शिवनेरी कॉलनी २, अन्य ३.

ग्रामीण भागातील रुग्ण...बजाजनगर २, चितेगाव १, वैजापूर २, पैठण १, विटावा ता. गंगापूर १, वाळूज २, कन्नड १, फुलंब्री १, गेवराई १, पिसादेवी ३, टाकळी राजेराय १, धावडा ता. सिल्लोड १, ए. एस. क्लब १, घाणेगाव ता. गंगापूर १, गल्ले बोरगाव ता. खुलताबाद १, तिसगाव ३, बोधेगाव, ता. फुलंब्री १, चापानेर ता. कन्नड १, सताडा, ता.फुलंब्री १, तसेच अन्य ८२.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद