शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : उच्चरक्तदाब आणि मधुमेह कोरानाग्रस्ताला नेतात मृत्यूच्या दारात; इतर आजारांमुळे उपचारास अल्पप्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 18:30 IST

corona virus : उच्चरक्तदाब, मधुमेह यासह अशा आजारांमुळे कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होते.

ठळक मुद्दे५० वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद नाही

औरंगाबाद : जिल्ह्यात रोज होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूने चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु रुग्णांच्या मृत्यूला फक्त कोरोनाच कारणीभूत नाही, तर कोरोनासह इतर आजारांमुळे रुग्णांची प्रकृती गंभीर होते आणि मृत्यू ओढावत आहे. कोरानाग्रस्ताला मृत्यूच्या दारात नेण्यात उच्चरक्तदाब पहिल्या क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर मधुमेह आहे. त्यामुळे हे आजार नियंत्रित ठेवण्यासह कोरोनाची लक्षणे दिसल्यावर वेळीच उपचार घेण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

वयाच्या ५० नंतर आणि वृद्धापकाळात अनेक आजारांना सामोरे जावे लागते. उच्चरक्तदाब, मधुमेह यासह अशा आजारांमुळे कोरोना रुग्णांची प्रकृती गंभीर होते. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याने मृत्यू ओढवत असल्याची परिस्थिती दिसून आली. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांमध्ये ५१ ते ८० या वयोगटांतील रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. कोरोनाबाधितांत मधुमेह, उच्चरक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. औरंगाबादेत कोरोनामुळे ५ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला होता. बळींची संख्या आजघडीला २ हजार ४०१ वर गेली आहे. जिल्ह्यात दररोज एक ते दीड हजार रुग्णांचे निदान होत आहे. या सगळ्यांत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. ५१ वर्षांवरील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण अधिक असून, बहुतांश मृतांना कोरोनासह अन्य आजारही असल्याचे समोर आलेले आहे. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, किडनी विकार आणि अन्य या आजारांचे प्रमाण अधिक आहे. एकाच वेळी अनेक आजारामुळे उपचारास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?मधुमेह, उच्च रक्तदाब हे आजार नियंत्रित ठेवले पाहिजे. त्याची औषधी वेळेवर आणि नियमित घेतली पाहिजे. विनाकारण चिंता करू नये. सकारात्मक राहिले पाहिजे. आजार, लक्षणे अंगावर काढू नये. वेळीच उपचार घेतले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग किती प्रमाणात झाला आणि रुग्णाची प्रतिकारशक्ती यावर सर्व अवलंबून असते. कमी वयात मृत्यूचे प्रमाण सध्या तरी कमी आहे.- डाॅ. अनिल जाेशी, अध्यक्ष, डेथ ऑडिट कमिटी, घाटी

१५ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान एकूण मृत्यू-१,४४१कोरोनामुळे मृत्यू-४५०इतर कारणांनी मृत्यू-९९१ 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू