शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : नियतीची क्रुरचेष्टा ! एकाचे अंत्यसंस्कार करायचे आणि दुसऱ्यासमोर खोटे हसायचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 12:48 IST

Corona Virus : आता जो आहे तो तरी सुखरूप घरी यावा म्हणून मग मुलांना दु:ख गिळून, आनंदीपणाचा मुखवटा वावरून फिरावे लागत आहे.

ठळक मुद्देआई वडिलांपैकी एकाचे निधन आणि दुसऱ्याला माहितीच नाहीकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना अशा अतिभयंकर प्रसंगातून जावे लागत आहे.

औरंगाबाद : कोरोनाने इतकी भयंकर वेळ आणली आहे की, आई - वडिलांपैकी एकाचे निधन झाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार करायचे आणि जो जिवंत आहे, त्याच्यापासून हे एवढे मोठे दु:ख लपवून ठेवायचे. वेळप्रसंगी त्याच्यासमोर खोटे हसायचे, तुमच्या दोघांच्याही प्रकृती सुधारत आहेत, तुम्ही लवकरच एकमेकांना भेटाल, असे मनावर दगड ठेवून सांगायचे आणि वेळ मारून न्यायची. नियतीने केलेली ही अशी क्रूरचेष्टा आज कोरोनामुळे अनेकांच्या वाट्याला येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना अशा अतिभयंकर प्रसंगातून जावे लागत आहे. वृद्ध आई - वडिलांना कोरोना झाला की, दोघांनाही दवाखान्यात ठेवावे लागते. यापैकी अनेक जण मधुमेह, रक्तदाब किंवा वार्धक्यामुळे होणाऱ्या इतर आजारांनी कृश झालेले असतात. ते कोरोनाच्या तावडीत चटकन सापडतात. योग्य आणि वेळेत उपचार मिळाले तरी कोरोनावर मात करण्यात अपयशी ठरतात आणि मृत्यू ओढवतो. पण त्याच वेळी त्यांचा जोडीदार मात्र त्यांच्यासारख्याच परिस्थितीतून जात असतो. कोरोनामुळे प्रकृती अधिकच नाजूक झालेली असते. पण ती लवकरच सुधारेल, अशी आशा डॉक्टरांनाही असते. अशा नाजूक स्थितीत आपल्या जोडीदाराचे असे अनंताच्या प्रवासाला निघून जाणे त्यांना अजिबातच झेपणारे नसते. त्यामुळे जोडीदाराच्या निधनाबाबत आताच काहीही कळू देऊ नका, कारण हा आघात पचविण्यासाठी त्यांचे शरीर त्यांना साथ देणार नाही, असे डॉक्टरांनीच सूचविलेले असते. त्यामुळे ज्यांना जायचे होते, ते तर निघून गेले.

आता जो आहे तो तरी सुखरूप घरी यावा म्हणून मग मुलांना दु:ख गिळून, आनंदीपणाचा मुखवटा वावरून फिरावे लागत आहे. आईला गमावले आहे आणि वडील सुधारत आहेत, किंवा वडील गमावले आईची तब्येत सुधारते आहे, अशी परिस्थिती आज अनेक मुलांसमोर ओढवली आहे. जाणारा गुपचूप निघून जातो. पण, जो राहतो त्याच्या प्रश्नांना सामोरे जाणे, अतिकठीण होते. गेल्याचे दु:ख करावे की, दुसऱ्याची प्रकृती सुधारतेय म्हणून समाधान मानावे, हेच अशावेळी कळत नाही, अशी आपबिती काहींनी सांगितली.

आता बाबांना कुठून आणू ?कोरोनामुळे आई - वडील दोघेही वेगवेगळ्या दवाखान्यात होते. दोघांकडेही मोबाईल असल्याने त्यांचे एकमेकांशी तसेच आमच्याशी फोनवर किंवा व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे व्हायचे. काही दिवसांनी वडील आयसीयूमध्ये दाखल झाल्याने त्यांना फोनवर बोलणे अशक्य झाले. काही दिवसांतच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आईची तब्येत सुधारत असली तरीही नाजूकच होती. त्यामुळे तिच्यापासून हे सगळे लपवून ठेवावे लागले. बाबा कसे आहेत, औषधे घेत आहेत ना, मला बोलायचेय त्यांच्याशी, बघायचेय त्यांना. एकदा तरी व्हिडिओ कॉल करून द्या ना, असे आई डोळ्यात पाणी आणून म्हणायची आणि आमचे हृदय पिळवटून निघायचे. आता कसा आणि कुठे व्हिडिओ कॉल करू आणि बाबांना कुठून आणू... असा केविलवाणा प्रश्न विचारत एका जणाने आपल्या भावनांना वाट करून दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू