शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : औरंगाबादला १४ तारखेपर्यंत धोका; रुग्णसंख्या १३०० पर्यंत जाण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 09:24 IST

१० दिवसांत रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता

ठळक मुद्देआरोग्य यंत्रणेचा खबरदारीचा इशारा

औरंगाबाद : शहरातील कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होण्याची भीती आहे. आगामी १४ मे पर्यंत रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आरोग्य यंत्रणेकडून वर्तविण्यात आली आहे. शहरातील रुग्णसंख्या १३०० पर्यंत जाऊ शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले. 

यापूर्वी आरोग्य यंत्रणेने २९ एप्रिल रोजी रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याचा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांत शहरात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाले. दररोज कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना शहरासाठी आणखी एक धोक्याची घंटा वाजली आहे. शहरात १९ एप्रिलपासून दररोज पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान होत आहे. त्यात गेल्या १६ दिवसांत एकही दिवस खंड पडलेला नाही. शहरात २७ एप्रिल ते ३ मे दरम्यान रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यात गेल्या ८ दिवसांत दररोज २० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. आता ५ ते १४ मे दरम्यान रुग्णसंख्या आणखी झपाटयाने वाढण्याची भीती आहे. 

या कालावधीत शहरातील रुग्णसंख्या १३०० च्या घरात जाऊ शकते, असा अंदाज आरोग्य यंत्रणेकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस शहरासाठी चिंतदायक ठरण्याची भीती आहे. 'क्लोज काँटॅक्ट'मुळेच रुग्णांत वाढ शहरात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दररोज वाढत आहे. मात्र, आद्यपही समूह संसर्ग नाहीच, असा दावा केला जात आहे. 'क्लोज काँटॅक्ट'मुळेच रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे.

आणखी एक हजार रुग्ण ? शहरात सध्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०० च्या पुढे आहे. त्यामुळे आणखी १ हजार रुग्ण वाढण्याची भीती आहे. या कालावधीत नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आणि रुग्णांच्या संपर्कातील लोकांना बाधा झाल्याचे निदान होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अशी आहे उपचाराची परिस्थिती शहरात २ हजार रुग्णांवर उपचाराची तयारी मनपाने केलेली आहे. तर घाटीत ४५० रुग्णांच्या उपचाराची सुविधा होऊ शकते, असे मनपाचे म्हणणे आहे. परंतु सध्या २०८ रुग्णांवर उपचाराची यंत्रणा घाटीत सज्ज आहे. यातही केवळ ४८ गंभीर रुग्णांवर उपचार शक्य आहे. जिल्हा रुग्णालयात २०० खाटा आहे. प्रत्यक्षात सध्या १३० रुग्णांवर उपचाराची सुविधा आहे. येथील सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. 

'डब्लूएचओ'चा इशाराजागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ)१४ मे पर्यंत रुग्णसंख्या वाढू शकते, असा इशारा दिला आहे. त्यानुसार शहरात १३०० पर्यंत रुग्णसंख्या जाऊ शकते. उपचाराच्या दृष्टीने मनपा, घाटी आणि आमच्याकडून नियोजन करण्यात आलेले आहे. - डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद