शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

Corona Virus : नियम तोडणाऱ्यांना दणका; पैठणमध्ये मोंढ्यातील दहा व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 12:43 IST

Corona Virus : कोरोना नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिला आहे.

ठळक मुद्देनियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवली

पैठण : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या कांदा मार्केटवर पोलीस व नगर परिषदेच्या संयुक्त पथकाने बुधवारी कारवाई केली. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० व्यापाऱ्यांवर पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू असून कडक नियमांवली लागू आहे. यानुसार जीवनावश्यक सेवांसाठी दुकाने ७ ते ११ या मर्यादित कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु, काही व्यापारी व दुकानदार वेळेची मर्यादा न पाळता सर्रासपणे दिवसभर दुकाने सुरू ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे खरेदीसाठी नागरीक घराबाहेर पडत असल्याने कडक नियमांच्या उद्देशास हरताळ फासला जात होते. 

बुधवारी दुपारी पोलीस व नगर परिषदेचे पथक नियमांच्या अंमलबजावणीसाठी गस्त घालत होते. यावेळी बाजार समितीच्या मोंढ्यात कांदा मार्केट सुरू असून तेथे मोठ्या संख्येने ग्राहकाची गर्दी झाल्याचे धक्कादायक चित्र पथकास आढळून आले. पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी मोंढ्यातील सर्व व्यापाऱ्यांनी कोरोना नियम पाळून सहकार्य करावे असे आवाहन केले. यानंतर नियमांचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्या शुभम विलास काला, हमीद बाबामियाँ बागवान, नाथा रामकीसन ढाकणे, सलीम अकबर बागवान , शेहराज करीम  बागवान , महादेव रामकीसन ढाकणे, राहुल प्रमोदकुमार पाटणी, केदारनाथ दादाराव सर्जे यांच्यासह कोर्ट रोडवरील साई टायर या दुकानदारांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गोपाळ पाटील, मुकुंद नाईक, मनोज वैद्य , अरुण जाधव , कल्याण ढाकणे , समादेशक राजू कोटलवार आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद