शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोनाने १३ वर्षीय मुलासह १४ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 12:01 IST

सध्या जिल्ह्यात २,०१९ रुग्णांवर उपचार सुरू

ठळक मुद्देजिल्ह्यात १३८ रुग्णांची वाढउपचारानंतर १९९ जणांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १३८ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील अवघ्या ३५, तर ग्रामीण भागातील १०३ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील एका १३ वर्षीय मुलासह १२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर अन्य जिल्ह्यांतील २ रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात सध्या २ हजार १९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार ३७३ एवढी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ३९ हजार ४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील ११४ आणि ग्रामीण भागातील ८५, अशा १९९ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना रामनगर, विहामांडवा येथील ८५ वर्षीय पुरुष, पंढरपूर येथील ५० वर्षीय महिला, फत्तेसिंगपुरा येथील ५४ वर्षीय पुरुष, नागमठाण, वैजापूर येथील ५५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ७५ वर्षीय महिला, आखतवाडा, खुलताबाद येथील ६० वर्षीय पुरुष, सिल्लेगाव, गंगापूर येथील ८० वर्षीय पुरुष, एन-८ येथील ६६ वर्षीय पुरुष, भानुदासनगरातील ५७ वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील ६५ वर्षीय पुरुष, खोकडपुरा येथील ७३ वर्षीय पुरुष, शिवराई, वैजापूर येथील १३ वर्षीय मुलगा आणि गेवराई, बीड येथील ६६ वर्षीय पुरुष, चिलेखानवाडी, नेवासा, अहमदनगर येथील ६० वर्षीय पुरुष यांचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद ४, सातारा परिसर ३, टिळकनगर १, बीड बायपास १, वाल्मी कॅम्पस, पैठण रोड १, बालाजीनगर १, वरद गणेश मंदिर २, जाधववाडी १, पैठण रोड १, ज्योती प्राईड ३, रामनगर १, घाटी १, देवळाई रोड १, हनुमाननगर १, राजीव गांधीनगर १, पैठण गेट १, संजयनगर १, अन्य १०.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर १, खुलताबाद १, कसाबखेडा १, निंभोरा, ता. कन्नड १, चिरासमल तांडा १, गंगापूर १, रांजणगाव शेणपुंजी २ आणि अन्य ९५.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद