शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: लसीकरणाकडे नागरिकांची पाठ, ४० हजार डोस एक्सपायर्ड होण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 14:01 IST

कोरोनाची चौथी लाट उंबरठ्यावर असताना आरोग्य विभागाने सतत आवाहन करूनही जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र

औरंगाबाद : ग्रामीण भागातील नागरिकांनी कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्याकडे पाठ फिरवल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या गोदामातील सुमारे ४० हजार कोविशिल्ड लसीचे डोस कालबाह्य (एक्सपायर्ड) होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. आता या लसीचा साठा पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला परत पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. कोविड महामारीनंतर गतवर्षी लसीकरणाला सुरूवात झाली. सुरूवातीला पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, काहीजण लसीकरणाला प्रतिसाद देत नव्हते. तेव्हा प्रशासक नीलेश गटणे यांनी युद्धपातळीवर विशेष मोहीम राबवून लसीकरण यशस्वी केले होते. ८४ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला होता. दुसरा डोस घेण्याबाबत मात्र नागरिक उदासीन आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७ लाख नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.

कोरोनाची चौथी लाट उंबरठ्यावर असताना आरोग्य विभागाने सतत आवाहन करूनही जिल्ह्यातील नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला मिळालेले कोविशिल्ड लसीचे ४० हजार डोस कालबाह्य होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाने शासनाला कळविली आहे. यामुळे लसीचा हा साठा पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटकडे परत पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद