शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

corona virus in Aurangabad : नातेवाइकांचा आक्रोश ! साहेब, काहीही करा, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 15:18 IST

corona virus in Aurangabad कोरोनासाठी महापालिकेने सुरू केलेल्या स्वतंत्र वॉर रूममध्ये २४ तासात किमान ३०० ते ५०० नागरिकांचे कॉल येतात. 

ठळक मुद्देवर्षभरापूर्वीच महापालिकेने कोरोनासाठी स्वतंत्र वॉररूम तयार केली आहे. एक वर्षापासून कर्मचारी सुट्टी न घेता २४ तास सेवा देत आहेत.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : कोरोनातील डबल म्यूटंट व्हायरस सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. संसर्ग झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये नागरिकांचा मृत्यू होतोय. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी नातेवाइकांना व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेड सहजासहजी मिळेनात. कोरोनासाठी महापालिकेने सुरू केलेल्या स्वतंत्र वॉर रूममध्ये २४ तासात किमान ३०० ते ५०० नागरिकांचे कॉल येतात. यातील बहुतांश नागरिकांना आपल्या रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची गरज असते. बेड उपलब्ध असल्यास संबंधित रुग्णालयांत जाण्याचा सल्ला मनपाकडून देण्यात येतो.

सुधारणा होण्याऐवजी कोरोना परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. वर्षभरापूर्वीच महापालिकेने कोरोनासाठी स्वतंत्र वॉररूम तयार केली आहे. या वॉररूममध्ये हेल्पलाइनची व्यवस्था आहे. एक वर्षापासून कर्मचारी सुट्टी न घेता २४ तास सेवा देत आहे. २४ तासात ३०० ते ५०० नागरिकांना मदत करण्याचे काम हेल्पलाइनकडून होते. औरंगाबाद महापालिकेचा हेल्पलाइन नंबर राज्यातील इतर जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे. शंभर ते सव्वाशे कॉल दररोज इतर जिल्ह्यातून येतात. औरंगाबाद शहर आणि परिसरातील नागरिकांचा बेड मिळविण्यासाठी सर्वात जास्त आक्रोश आहे. महापालिकेच्या एमएचएमएच ॲपवर उपलब्ध बेडची माहिती वेळोवेळी अद्ययावत करण्यात येते. ज्या ठिकाणी बेड उपलब्ध आहेत तेथील माहिती नागरिकांना देण्यात येतो. याशिवाय वॉररूममधून पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रुग्ण, लसीकरण मोहीम, घाटी रुग्णालयाकडून प्राप्त होणारे अहवाल आधी वेगवेगळ्या आघाड्यांवर काम करण्यात येते. वॉररूम महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी बॅकबोन म्हणून काम करीत आहे.

वॉररूममध्ये ४५ कर्मचारी

मार्च २०२० मध्येच महापालिका मुख्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली. त्यासाठी ४५ कर्मचारी नेमले आहेत. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये २४ तास कर्मचारी काम करीत असतात. होम आयसोलेशनमधील रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी स्वतंत्र शिक्षकही नेमले आहेत. वॉररूममधील डाटा फीडिंगचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वात मोठी जबाबदारी दिलेली आहे. अँटिजन, आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या नागरिकांची माहिती तयार करण्यात येते. कोरोनाशी संबंधित सर्वाधिक अपडेट माहिती ठेवण्याचे काम येथील कर्मचारी करतात. वेगवेगळ्या केंद्रांवरून माहिती उपलब्ध न झाल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. शहरातील खासगी रुग्णालये महापालिकेला अजिबात माहिती उपलब्ध करून देत नाहीत हे विशेष.

पॉझिटिव्ह आलोय, कुठे उपचार घ्यायला जाऊमागील वर्षी लाळेचे नमुने दिल्यानंतर संशयित रुग्णाला महापालिकेच्या स्वतंत्र विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येत होते. आता रुग्ण लाळेचे नमुने देऊन घरी जातो. पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळताच तो महापालिकेच्या हेल्पलाइनशी संपर्क साधतो. डॉ. बासित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना पुढील मार्गदर्शन २४ तास करतात. महापालिकेच्या यंत्रणेलाही पॉझिटिव्ह रुग्ण कुठे उपचारासाठी ठेवावेत याबाबत ते मार्गदर्शन करतात.

व्यवस्था चांगलीमहापालिका प्रशासनाकडून वॉररूममधील कर्मचाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था केलेली आहे. चहा, नाश्ता उपलब्ध करून देण्यात येतो. काम खूप आहे. अनेकदा काही जण आजारी पडतात. त्यामुळे कामाचा लोड प्रचंड वाढतो. आणखी कर्मचारी वाढवल्यास कामाचा थोडा लोड कमी होऊ शकतो, असे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

रिपोर्टिंग चांगली गेली पाहिजेकोरोनाशी संबंधित प्रत्येक माहिती अद्ययावत व्हावी, राज्यशासनाला रिपोर्टिंग चांगली गेली पाहिजे, या दृष्टीने वॉररूममधील कर्मचाऱ्यांचा कसोशीने प्रयत्न सुरू असतो. दिवसभरातून तीन ते चार वेळेस वेगवेगळ्या माहितीचे रकाने अपडेट करावे लागतात. माहिती संकलित करावी लागते.- डॉ. मेघा जोगदंड, वॉररूम प्रमुख.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका