शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus in Aurangabad : मुंबईत कर्तव्य बजावून परतलेल्या एसटी वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 13:54 IST

corona virus in Aurangabad : १० एप्रिल रोजी मुंबईत बेस्ट वाहतुकीसाठी गेले होते. कर्तव्य बजावून ते १८ एप्रिल रोजी औरंगाबादेत परतले.

ठळक मुद्देएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्हेंटिलेटर मिळाला नसल्याचा नातेवाइकांचा आरोप

औरंगाबाद : मुंबईतील बेस्ट वाहतुकीसाठी कर्तव्य बजावून परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एसटी महामंडळाच्या वाहकाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना या वाहकाचा दुर्दैवाने साेमवारी मृत्यू झाला.

शेकनाथ शंकर सिरसाठ (४९) असे मयत वाहकाचे नाव आहे. शेकनाथ सिरसाठ हे सिल्लोड आगारात कार्यरत होते. ते १० एप्रिल रोजी मुंबईत बेस्ट वाहतुकीसाठी गेले होते. कर्तव्य बजावून ते १८ एप्रिल रोजी औरंगाबादेत परतले. येथे आल्यानंतर १९ एप्रिल रोजी त्यांनी कोरोना तपासणी केली. २० एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. प्रारंभी ४ दिवस त्यांच्यावर सिल्लोड येथे उपचार करण्यात आले; परंतु प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबादेत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. प्रशासनाकडून सदर वाहकाच्या उपचारासाठी आवश्यक ती मदत करण्यात आली, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

व्हेंटिलेटरची शोधाशोधशेकनाथ सिरसाठ यांचे नातेवाईक विजय कळम म्हणाले, शहरात व्हेंटिलेटरची शोधाशोध केली; परंतु कुठेही ते उपलब्ध झाले नाही. ऑक्सिजन देऊन उपचार केले. अखेर त्यांना मृत्यूने गाठले. एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविले जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका निर्माण होत आहे.

५० लाखांचा विमा कवच मिळावाअन्य विभागातून मुंबईला चालक-वाहकांना पाठविणे बंद झाले आहे; परंतु औरंगाबादेतून कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठविणे सुरूच आहे. हे बंद झाले पाहिजे. जे कर्मचारी कोरोनाने मृत्यू पावले, त्यांच्या नातेवाइकांना ५० लाखांचे विमा कवच दिले पाहिजे.- बाबासाहेब साळुंके, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या