शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus In Aurangabad : कोरोनाने शहरातील ५ तर ग्रामीणच्या २० रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 14:17 IST

CoronaVirus In Aurangabad : सध्या जिल्ह्यात ९,३१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्दे जिल्ह्यात दिवसभरात ९४६ नव्या रुग्णांची वाढ तसेच उपचारानंतर जिल्ह्यातील १,०५१ जणांना सुटी

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ९४६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील ३२८, तर ग्रामीण भागामधील ६१८ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १,०५१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. ग्रामीण भागांत नव्या रुग्णांसह मृत्यूचा आलेखही वाढत आहे. गेल्या २४ तासांत औरंगाबाद शहरातील ५, ग्रामीण भागातील तब्बल २० रुग्णांचा मृत्यू झाला. त्याबरोबरच अन्य जिल्ह्यांतील १० रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या आता रोज एक हजाराखालीच राहत असल्याने दिलासा व्यक्त होत आहे. जिल्ह्यात सध्या ९,३१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २९ हजार ८४८ झाली आहे. आतापर्यंत १ लाख १७ हजार ८५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,६८३ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ५०२ आणि ग्रामीण भागातील ५४९ अशा १,०५१ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना पैठण येथील ४६ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय पुरुष, खुलताबाद येथील ४८ वर्षीय पुरुष, कन्नड येथील २६ वर्षीय महिला, गजगाव, गंगापूर येथील ५५ वर्षीय पुरुष, शेलगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, मिसारवाडी येथील ४९ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७३ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ६५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ५५ वर्षीय महिला, गंगापूर येथील ५८ वर्षीय महिला, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, सिडकोतील ६६ वर्षीय महिला, बजाजनगरातील ६२ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ६५ वर्षीय महिला, हनुमंतखेडा, सोयगाव येथील ४२ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, मिसारवाडी येथील २७ वर्षीय पुरुष, एन-११ येथील ८१ वर्षीय महिला, जातेगाव, फुलंबी येथील ७३ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ४९ वर्षीय पुरुष, धूपखेडा येथील ५९ वर्षीय पुरुष, विरमगाव, फुलंब्री येथील ४५ वर्षीय पुरुष, टाकळी, गंगापूर येथील ५७ वर्षीय महिला, वरखेड, गंगापूर येथील ३१ वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ४५ वर्षीय महिला, ३६ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष, ६८ वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, ४९ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ५० वर्षीय महिला, बोरखेडा येथील ६३ वर्षीय पुरुष, जळगाव जिल्ह्यातील ६२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णसातारा परिसर ११, बीड बायपास १६, शिवाजीनगर ८, गारखेडा ७, मयूर पार्क १०, मिसारवाडी १, एन-५ येथे ४, एन-६ येथे ६, भोईवाडा २, केशवनगरी १, दलालवाडी १, खोकडपुरा १, मुकुंदवाडी २, पडेगाव ७, भावसिंगपुरा ६, उल्कानगरी २, समतानगर १, व्यंकटेश कॉलनी १, एन-१ येथे ४, एस.टी. कॉलनी १, एन-७ येथे १, अंबिकानगर १, रामनगर ३, एन-२ येथे ७, विश्रांतीनगर १, जयभवानीनगर ४, चिकलठाणा २, न्यू हनुमाननगर १, हर्सूल २, जाधववाडी २, न्यायनगर २, एन-४ येथे ५, नक्षत्रवाडी ७, कांचननगर २, शहानूरमियाँ दर्गा २, आलोकनगर २, एसआरपीएफ कॅम्प १, लक्ष्मी कॉलनी २, सूर्यादीपनगर १, लक्ष्मीनगर २, नाईकनगर १, आशानगर १, पुंडलिकनगर ४, चेतन घोडा १, देवळाई रोड १, हाउसिंग सोसायटी १, अशोकनगर १, जवाहर कॉलनी २, टी.व्ही. सेंटर २, राधास्वामी कॉलनी २, पहाडसिंगपुरा २, लेबर कॉलनी १, आंबेडकरनगर १, एन-८ येथे ३, सेव्हन हिल १, चेतनानगर १, बसैयेनगर २, मिलकॉर्नर २, एन-१० येथे १, बायजीपुरा १, एन-९ येथे २, चौधरी कॉलनी १, गजानननगर २, दिवाणदेवडी १, अजबनगर १, श्रेयनगर १, राहुलनगर १, देवळाई परिसर ६, अबरार कॉलनी १, पेठेनगर २, विष्णूनगर २, ज्युबिली पार्क २, विमानतळ २, उस्मानपुरा २, पद्मावती कॉलनी स्टेशन रोड १, एकनाथनगर १, बनेवाडी १, सिंधी कॉलनी १, न्यू लक्ष्मी कॉलनी १, ज्योतीनगर १, बन्सीलालनगर २, प्रतापनगर १, शाहनूरवाडी २, न्यू एसबीएच कॉलनी २, नंदनवन कॉलनी २, एमजीएम पीजी हॉस्टेल १, मिलिटरी हॉस्पिटल १, न्यू बालाजीनगर १, कांचनवाडी ३, अरिहंतनगर १, शिल्पनगर १, क्रांतीचौक १, मनजितनगर १, वेदांतनगर १, जटवाडा रोड १, अमृतसाई प्लाझा १, भाग्योदय सोसायटी १, एमआयटी कॉलेज १, सिव्हिल हॉस्पिटल १, भुजबळनगर १, घाटी २, एमजीएम हॉस्पिटल १, एन-११ येथे १, भगतसिंगनगर १, अन्य ९२.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर १७, सिडको वाळूज महानगर- १ येथे ७, वडगाव कोल्हाटी १, जोगेश्वरी १, सिल्लोड २, रांजणगाव ४, पिसादेवी ५, दौलताबाद २, आडूळ, ता. पैठण २, पाचोड १, सालेगाव, ता. कन्नड १, खांडेवाडी १, वाळूज ४, बाळापूर १, भराडी, ता. सिल्लोड १, जडगाव करमाड १, जरंडी, ता. सोयगाव १, फुलंब्री १, डुबखेडा बिडकीन १, करमाड १, वैजापूर १, धूपखेडा २, गिरनार तांडा १, शेंद्रा १, शहापूर, ता. गंगापूर २, अन्य ५५६.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद