शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

Corona Virus : केंद्र सरकारपासून लपले औरंगाबादेतील ५७० कोरोना रुग्णांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 11:35 IST

Corona Virus:आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वाॅररूममध्ये पोर्टलवर नोंदणी करण्याचे काम केले जात आहे.

ठळक मुद्देअँटिजन टेस्ट आणि रुग्णांना रेफर करण्याच्या गोंधळात रुग्णांची नोंदच होईना

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : औरंगाबादेतील तब्बल ५७० मृत्यूपासून केंद्र सरकार अनभिज्ञ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण कोरोनासंदर्भातील पोर्टलवर औरंगाबादेत २ हजार ३५२ मृत्यूची नोंद आहे. प्रत्यक्षात रविवारपर्यंत औरंगाबादेत २ हजार ९२२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अँटिजन टेस्ट आणि रुग्णांना रेफर करण्याच्या गोंधळात रुग्णांची नोंदच होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, औरंगाबादेतील मृत्यूची गंभीर स्थिती केंद्रापासून लपून रहात असून, त्यातून उपाययोजनांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आरोग्यासंदर्भातील स्थानिक स्तरावरील माहिती जिल्हा स्तरावरून आरोग्य उपसंचालक कार्यालय, तेथून पुढे राज्य शासनाला माहिती जाते. तर राज्याकडून केंद्राकडे माहिती जाते. कोरोनासंदर्भातील रुग्णसंख्या, मृत्यूची स्थिती स्थानिक पातळीवरून थेट केंद्राला लक्षात यावी, यासाठी पोर्टलवर नोंद करणे गरजेचे ठरते. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महापालिका, घाटी यांना कोरोना रुग्णांची, मृत्यूची नोंद करण्यासाठी पोर्टलचा लाॅगइन आयडी आणि पासवर्ड देण्यात आलेला आहे. परंतु अनेकांकडून ही माहिती भरण्यास अनेक कारणांनी विलंब होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कागदोपत्री (मॅन्युअली) कोरोना मृत्यूचे आकडे वेगळे आहेत, तर पोर्टलवरील आकडे वेगळे आहेत. यात तब्बल ५७० रुग्णांच्या मृत्यूचा फरक पडत आहे. स्थानिक पातळीवर जरी ही नोंद असली तर पोर्टलवर नोंदीअभावी केंद्राला त्यासंदर्भात माहिती मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, औरंगाबादेत मृत्यू कमी असल्याचे कारण पुढे होऊन कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांकडे केंद्राकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाॅररूममध्ये नोंदणीवर भरआरोग्य उपसंचालक कार्यालयातील वाॅररूममध्ये पोर्टलवर नोंदणी करण्याचे काम केले जात आहे. महापालिकेचेही स्वतंत्र वाॅररूम आहे. पाेर्टल म्हणजे एकत्रित रिपोर्टिंग प्रणाली आहे. नोंद झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंदणी करण्यावर भर दिला जात असल्याचे आरोग्य उपसंचालक स्वप्नील लाळे म्हणाले.

नोंद करण्याची सक्त सूचनाप्रत्येक आरोग्य संस्थेला पोर्टलवर नोंदणी करण्याची सक्त सूचना केली आहे. जिथे रुग्णाचा मृत्यू झाला तेथूनच नोंद होणे गरजेचा आहे. मॅन्युअली आणि पोर्टलवरील संख्येत फरक आहे. परंतु मंत्रालयाला रोज रिपाेर्ट दिला जातो. पोर्टलवरील नोंदी केंद्राला दिसतात.- डाॅ. जी. एम. कुडलिकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद