शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील ३२१ गावांत थांबली कोरोना रुग्णवाढ; १८२ गावांत संक्रमण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 19:13 IST

ग्रामीण भागात कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण तालुक्याच्या गावांसह शहरागलगतच्या मोठ्या बाजार गावांत आढळून येत आहेत.

ठळक मुद्दे ७९२ ग्रामीणमध्ये, तर ११४५ रुग्ण उपचारासाठी शहरात१०० पेक्षा अधिक रुग्णांची १३ गावे५० ते १०० रुग्ण असलेली ८ गावे

औरंगाबाद : जिल्ह्यातील १३६८ पैकी ५०३ गावांत कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचला. त्यापैकी ६७ गावांत ७ आणि १०१ गावांत १४, तर १५३ गावांत २८ दिवसांपासून एकही रुग्ण सापडला नाही. ३२१ गावांत रुग्णवाढ थांबली असली तरी १८२ गावांत संक्रमण सुरूच आहे. ७९२ रुग्ण ग्रामीणमध्ये, तर ११४५ रुग्ण शहरात उपचार घेत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी दिली.

ग्रामीण भागात कोरोनाबाधित सर्वाधिक रुग्ण तालुक्याच्या गावांसह शहरागलगतच्या मोठ्या बाजार गावांत आढळून येत आहेत. आतापर्यंत ११ हजार ८२ रुग्ण आढळले. त्यापैकी ८९२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर २१७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने १९३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. १३६८ गावांपैकी एकूण ५०३ गावांत बाधित रुग्ण सापडले. त्यात ४२५ गावांत २५ पेक्षा कमी रुग्ण, २९ गावांत २५ ते ५० रुग्ण, ८ गावांत पन्नासपेक्षा अधिक तर १३ गावांत शंभरपेक्षा अधिक रुग्ण आढळले. त्यापैकी ३२१ गावांतील रुग्णवाढ थांबली असून, १८२ गावांतील १९३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ६८२ रुग्ण २२ कोविड केअर सेंटर तर ११० रुग्ण ५ ग्रामीण जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून, उर्वरित ११४५ रुग्ण शहरातील रुग्णालयांत भरती आहेत. सौम्य व लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनची सुविधाही  दिली जात आहे. मृत्यूदर घटवणे व संक्रमण रोखण्यासाठी उपचारावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, आरोग्य विभाग घरोघरी सर्वेक्षण करत असल्याची माहिती डॉ. गंडाळ यांनी दिली. 

डबलिंग रेट २८.०२ दिवसगेल्या आठवड्याचा डबलिंग रेट २८.०२ दिवस तर आतापर्यंतच्या आढळलेल्या रुग्णसंख्येचा डबलिंग रेट ७६ दिवस असल्याची माहिती डॉ. वाघ यांनी दिली. जिल्ह्यातील रुग्णांसंदर्भातील माहिती संकलन, विश्लेषण व समन्वयासाठी ही वॉररूम कार्यरत आहे. वॉर रूम प्रमुख डॉ. वाघ व जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. जी. एम. कुडलीकर यांच्या मार्गदर्शनात काम सुरू आहे.  

१०० पेक्षा अधिक रुग्णांची १३ गावेगंगापूर, कन्नड, सिल्लोड, वैजापूर, पैठण या तालुक्यांच्या गावांचा समावेश १०० पेक्षा अधिक रुग्ण आढळलेल्या यादीत झाला आहे. वडगाव कोल्हाटी, बजाजनगर, रांजणगाव शेणपुंजी, वाळूज, चितेगाव  ही औद्योगिक परिसरातील तसेच औरंगाबाद शहरालगतची गावे आहेत. तसेच लासूरस्टेशन, अजिंठा, शिऊर या बाजाराच्या दृष्टीने मोठ्या गावांतही कोरोना संक्रमण चिंताजनक बनले आहे.

५० ते १०० रुग्ण असलेली ८ गावेपंढरपूर, करमाड, फुलंब्री, गणोरी, सावखेडा, जामगाव, बिडकीन, वडवळी येथे ५० ते १०० दरम्यान रुग्ण आढळून आले आहेत. ही सर्व गावे मोठी आहेत. येथील रुग्णवाढ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद