शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोनाग्रस्ताने घेतली चौथ्या मजल्यावरून उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 13:16 IST

घाटी रुग्णालयात सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या चौथ्या मजल्यावरून एका कोरोनाग्रस्त रुग्णाने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवार दि. २७ रोजी सकाळी ७: ३० वा. घडली.

औरंगाबाद : घाटीतील सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या चौथ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये डॉक्टरांचा राऊंड सुरू असतानाच पैठण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या कोरोनाच्या रूग्णाने  खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी स. ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. बेडपॅन घेऊन खाटेजवळचा पडदा झाकून कोणाला काही कळण्याच्या आतच उडी मारून त्यांनी जीवन संपविले.

काकासाहेब कणसे (४२ वर्षे, धनगाव, ता. पैठण) असे मयत रूग्णाचे नाव आहे.  घाटीत दि. २१ सप्टेंबर रोजी ते  उपचारासाठी दाखल झाले होते.  ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांच्यावर सुपर  स्पेशालिटी ब्लॉकच्या चाैथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात  उपचार सुरू होते.  नेहमीप्रमाणे रविवारी स. ७ वाजेच्या सुमारास डॉक्टरांचा याठिकाणी राऊंड सुरू होता. 

डॉक्टर रूग्णांच्या प्रकृतीची तपासणी करीत होते. तर परिचारिका औषधी देत होत्या. त्याचवेळी काकासाहेब यांनी पाणी मागितले. डॉक्टरांनी त्यांना पाणी दिले. पाणी पिल्यानंतर त्यांनी बेडपॅनची मागणी केली असता एका सफाई कर्मचाऱ्याने त्यांना बेडपॅनही दिले.  काकासाहेब यांनी शौचासाठी  खाटेभोवतीचा पडदा लावून घेतला. तेव्हा तो कर्मचारी थोडा दूर उभा होता. त्यानंतर अवघ्या १० मिनिटातच जोरदार आवाज झाला असता  कर्मचाऱ्याने  पडदा सरकावून आतमध्ये पाहिले असता काकासाहेब खाटेवर नव्हते. खिडकीही उघडी होती. 

याविषयी त्याने तात्काळ एका ब्रदरला महिती दिली. ब्रदरनेही रूग्णाच्या खाटेजवळ धाव घेतली. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा खाली  कोसळलेल्या रूग्णाची अवस्था पाहून दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला. या घटनेची माहिती तात्काळ निवासी वैद्यकीय अधिकारी आणि सुरक्षा  रक्षकांना देण्यात आली. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, डॉ. सुधीर चौधरी यांनी  घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी एमएलसी नोंदविली. 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

रूग्णालयात दाखल झाल्यानंतर कणसे हे मानसिक ताणाविषयी डॉक्टरांशी काहीही बोलले नव्हते. एखाद्या रूग्णाने मानसिक ताणाविषयी  सांगितले  तर त्याचे तात्काळ समुपदेशन करण्यात येते. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे डॉ. येळीकर यांनी सांगितले.  तसेच याप्रकरणी कोणाची  चूक  दिसत नसल्याने सध्यातरी कोणावर कारवाई होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद