शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

'रुग्ण खूप वाढले; पप्पा काळजी घ्या'; कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने पोलिसांची मुले करतात काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 15:57 IST

kids of police persons worried a lot due to corona spread पोलीस बाबाला कोरोना बाधा होईल, या विचाराने त्यांची अल्पवयीन मुले- मुली चिंता व्यक्त करीत आहेत.

ठळक मुद्देबाहेर जा, पण काळजी घ्याते घराबाहेर असल्यावर खूप काळजी वाटतेमास्क घालूनच काम करावे

- बापू सोळुंके

औरंगाबाद: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना बारा तास नाकाबंदी करावी लागते. काम करीत असताना अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी कोरोनाचे शिकार होत आहेत. या भयावह स्थितीत कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या पोलिसांना पप्पा काळजी घ्या, मास्क काढू नका, अशी आर्त विनंती त्यांची लहान मुले करताना दिसत आहेत.

औरंगाबाद शहरात रोज सुमारे ६०० ते ७०० कोरोना बाधितांची भर पडत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यापूर्वी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर आहेत. आताही दिवसरात्र शहरातील ५९ पॉईंटवर पोलिसांना नाकाबंदी करावी लागते. ही नाकाबंदी करीत असताना पोलिसांनाही कोरोनाची बाधा होत आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील शेकडो अधिकारी, कर्मचारी कोरोना संक्रमित झाले. यापैकी काहींना आपल्या प्राणास मुकावे लागले. या पार्श्वभूमीवर पहिल्या टप्प्यात पोलिसांची लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली; मात्र अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले नाही. लसीकरणानंतरही कोरोना बाधित होण्याच्या घटना घडत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरातील सर्व रुग्णालये भरली. ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा निर्माण झाला. रेमडेसिविर इंजेक्शनसाठी रुग्णाच्या नातेवाइकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. अशा परिस्थितीत आपल्या पोलीस बाबाला कोरोना बाधा होईल, या विचाराने त्यांची अल्पवयीन मुले- मुली चिंता व्यक्त करीत आहेत. यामुळे कामावर निघालेल्या वडिलांना ते ‘बाबा मास्क काढू नका, सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा’, असे सांगतात.

बाहेर जा, पण काळजी घ्याकोरोनामुळे एवढे लोक पॉझिटिव्ह झाले, अमुक व्यक्तीचे निधन झाले, अशा थरकाप उडविणाऱ्या बातम्या वाचायला आणि टीव्हीवर पाहायला मिळतात. माझे पप्पा बारा तास कामावर असतात. तेव्हा त्यांची काळजी वाटते. घराबाहेर पडताना मास्क कधीही उतरू नये, मी त्यांना सांगतो. तसेच सॅनिटायझर सोबत आहे अथवा नाही, हेदेखील विचारतो.- मोहम्मद साकीब खान (वय १४ )

ते घराबाहेर असल्यावर खूप काळजी वाटतेमाझे पप्पा फौजदार आहेत. ड्युटीवर असताना ते कोरोना पॉझिटिव्ह झाले आणि उपचार घेऊन बरेही झाले. त्यांना पुन्हा कोरोनाची बाधा होऊ नये, याकरिता नाका-तोंडाला लावलेला मास्क खाली घेऊ नका, असे मी त्यांना सांगते. ते घराबाहेर असल्यावर त्यांची खूप काळजी वाटते.- मंजुश्री रतन डोईफोडे.(वय ११)

मास्क घालूनच काम करावेपोलीस असल्यामुळे पप्पाचा लोकांशी संपर्क येतो. अशा वेळी त्यांची काळजी वाटते; मात्र काम करताना त्यांनी गर्दीत जाऊ नये. गर्दीत गेल्यामुळे कोरोनाची बाधा होण्याचा धोका असतो. यामुळे शक्यतो पप्पांनी एकटेच रहावे आणि मास्क घालूनच काम करावे, असे मी त्यांना सांगते.- दाक्षायणी संतोष मुदीराज (वय १३)

त्यांनी घरीच रहावे, असे वाटतेकोरोना संपेपर्यंत पप्पाने घरीच रहावे, त्यांनी घराबाहेर जाऊच नये, असे वाटते. त्यांना काही व्हायला नको, याची आम्हाला चिंता सतावते.- साईराज मुदीराज (वय १०)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस