शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ६ एन्ट्री पॉइंटवर उद्यापासून कोरोना तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 18:56 IST

corona virus in Aurangabad दोन आठवड्यांपासून शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागावर प्रचंड ताण येत आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय पथकाने सूचना केल्यानंतर मनपाचा निर्णय

औरंगाबाद : कोरोनाचा कहर वाढत चालल्यामुळे महापालिकेने आता सहा एन्ट्री पॉइंटवर चोवीस तास पथके तैनात करून तपासणीचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून शहरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाईल. ज्या प्रवाशांना लक्षणे दिसतील त्यांची अ‍ॅन्टीजेन चाचणी केली जाईल, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी गुरुवारी दिली. केंद्रीय पथकाने गेल्या आठवड्यात सूचना केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन आठवड्यांपासून शहरात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे आरोग्य विभागावर प्रचंड ताण येत आहे. पालिकेने १२ कोविड केअर सेंटर सुरू केले असून, आणखी सेंटर सुरू करावे लागण्याची शक्यता आहे. संसर्ग कमी करण्यासाठी आता जास्तीच्या चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात येणारी वाहने थांबवून प्रवाशांची स्क्रिनिंग केली जाईल. ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसून येतील, त्यांच्या चाचण्या करून अहवाल पॉझिटिव्ह आल्यास कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाईल. ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्यांनाच शहरात प्रवेश दिला जाईल, असे डॉ. पाडळकर यांनी नमूद केले.

या ठिकाणी होईल तपासणीचिकलठाणा येथील केंब्रिज शाळा चौक, सावंगी येथील टोल नाका, दौलताबाद टी पॉइंट, नक्षत्रवाडी, झाल्टा फाटा या ठिकाणी कोरोना चाचणीसाठी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. गतवर्षी बाहेरगावाहून शहरात येणाऱ्या प्रवाशांची या एन्ट्री पॉइंटवर तपासणी करण्यात आली होती. त्यात हजारो नागरिक पॉझिटिव्ह आढळून आले होते.

१९ वॉर्ड रेड झोनमध्येकोरोना संसर्ग जास्तीचे रुग्ण असलेले १९ वॉर्ड रेड झोनमध्ये टाकले आहेत. या ठिकाणी जास्त चाचण्या करण्यासाठी पथके तयार केली आहेत. ही पथके लसीकरणासाठी मदत करतील, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका