शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना इफेक्ट : ट्रॅव्हल बसची ४० % भाडेवाढ; पुण्याचे भाडे ६०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:14 IST

राज्य सरकारने परवानगी दिल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना आणि प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.  

ठळक मुद्देपहिल्या दिवशी शहरातून जवळपास ३० ट्रॅव्हल्स धावल्या. खबरदारी म्हणून स्लिपर बसमधून २० प्रवाशांची वाहतूक सिटिंग बसमध्ये आसन क्षमतेच्या  ५० टक्के प्रवासी

औरंगाबाद : तब्बल पाच महिन्यांनंतर बुधवारपासून ट्रॅव्हल्स बस रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी  शहरातून  जवळपास ३०  ट्रॅव्हल्स  धावल्या. गेल्या काही महिन्यांत झालेली डिझेलची दरवाढ, कोरोनामुळे आता मर्यादित प्रवाशांची वाहतूक, मास्क, सॅनिटायझर आदींवरील खर्चामुळे ४० टक्क्यांपर्यंत भाढेवाढ झाल्याची माहिती खाजगी बसच्या संघटनेतर्फे देण्यात आली.

राज्य सरकारने परवानगी दिल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना आणि प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.  पहिल्या दिवशी बुधवारी पुणे, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर, लातूर आदी मार्गांवरील बससेवेला प्रवाशांनी प्रतिसाद  दिला.  कोरोनामुळे खबरदारी म्हणून स्लिपर बसमधून २० प्रवाशांची वाहतूक केली जात आहे, तर सिटिंग बसमध्ये आसन क्षमतेच्या  ५० टक्के प्रवासी वाहतूक केली जात आहे. यात आसन क्षमतेच्या बसमध्ये एक आसन रिकामे ठेवले जात आहे. 

कोरोनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. प्रवासापूर्वी प्रवाशांच्या तापमानाची तपासणी केली जात आहे. प्रवाशांना मास्क, सॅनिटायझर, यूज अ‍ॅण्ड थ्रो बेडशीट देण्यात येत आहे. कोरोनामुळे मर्यादित प्रवाशांची वाहतूक करावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांत ३० रुपयांनी डिझेलचे दर वाढले. त्यामुळे भाडेवाढ करावी लागल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. ट्रॅव्हल बसच्या प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार यांनी सांगितले.

काही मार्गांवरील भाडेपूर्वी मुंबईचे भाडे ७०० रुपये होते. आता मुंबईचे भाडे १३०० रुपयांपर्यंत वाढवावे लागले आहे. सोलापूरसाठी पूर्वी स्लिपर बसचे ५५० रुपयांपर्यंत भाडे होते. हे भाडे आता ७५० रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे. पुण्यासाठी  ६०० रुपयांपर्यंत भाडे मोजावे लागत आहे. नागपूर स्लिपर बसचे भाडे २ हजार रुपयांपर्यंत आकारण्यात येत आहे. वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स एजन्सीचे दर वेगवेगळे आहेत. एकूणच कोरोनाच्या आडून खासगी प्रवासी वाहतूकदार प्रवाशांची लूट करणार आहेत. 

कोरोनापूर्वी डिझेल ६० रुपये लिटर  होते. आता  ८१ रुपयांपर्यंत वाढले आहे.  कोरोनामुळे बसमधील आसन क्षमता कमी करण्यात आली आहे. प्रवाशांना मास्क,  सॅनिटायझर आदी सुरक्षा साहित्य देण्यात येत आहे. त्यामुळे  बसच्या तिकीट दरात ४० टक्क्यांपर्यंत वाढ करावी लागली आहे. प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची सक्ती नाही; परंतु प्रवाशांनी खबरदारी म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्र घेतले पाहिजे. प्रवाशांची योग्य ती काळजी घेतली जाईल.- पुष्कर लुले, सहसचिव, बस ओनर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजंटस असोसिएशन  

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या