शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनाची शाही रेल्वे डेक्कन ओडिसीच्या प्रवासाला कोरोनाचा ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 18:17 IST

एकट्या औरंगाबादेत दरवर्षी किमान २२ डेक्कन ओडिसी दाखल होत असतात.

ठळक मुद्देयंदा पर्यटन व्यवसायाला फटका

औरंगाबाद : राजेशाही थाट... पंचतारांकित सोयी- सुविधा, अशा भव्यतेने नटलेल्या डेक्कन ओडिसीच्या प्रवासाला यंदा कोरोनामुळे ‘ब्रेक’ लागला आहे. दरवर्षी सप्टेंबरपासून ही औरंगाबादेत दाखल होत असे. मात्र, प्रथमच यावर्षी या रेल्वेचा प्रवास थांबला आहे.

दरवर्षी सप्टेंबर ते मे हा डेक्कन ओडिसीचा हंगाम मानला जातो.  या ‘पॅलेस ऑन व्हिल रेल्वे’तून दरवर्षी देश-विदेशांतील पर्यटक मुंबई, औरंगाबाद, नागपूर यासह राज्यातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देतात. या रेल्वेतून युरोपियन, अमेरिकन, जपानी, तसेच अन्य अनेक देशांतील पर्यटकांनी देशातील विविध स्थळांना आतापर्यंत भेट दिली आहे. एकट्या औरंगाबादेत दरवर्षी किमान २२ डेक्कन ओडिसी दाखल होत असतात. त्यातून १,४०० ते १,५०० पर्यटक जगप्रसिद्ध वेरूळ लेणी आणि शहरातील बीबी का मकबरा या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत. मात्र, यावर्षी या रेल्वेला कोरोनामुळे रेड सिग्नल लागला आहे. हिरवा सिग्नल कधी पडणार हे अनिश्चित आहे. 

लाखोंचा व्यवसाय ठप्पडेक्कन ओडिसीने पर्यटक औरंगाबादेत आल्यानंतर प्रर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी बस, चारचाकी वाहनांचा वापर होतो. यातून वाहतूकदार, चालक, क्लीनर, गाईड यांना रोजगार मिळतो. शिवाय वेरूळ, बीबी का मकबरा येथे पर्यटक विविध वस्तूंची खरेदी करतात. अनेकदा हे पर्यटक पंचातारांकीत हॉटेलमधून जेवनही घेतात. शहरात फिरतात. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल होते; परंतु ही उलाढालच सध्या ठप्प झाली आहे.

युरोपात लॉकडाऊन, परदेशी पर्यटक येतील कसे?एक डेक्कन ओडिसी आल्याने अनेकांना रोजगार मिळत होता; परंतु कोरोनामुळे हंगाम सुरू होऊनही ही रेल्वे दाखल होऊ शकत नाही. त्याचा अनेकांना आर्थिक फटका बसत आहे. युरोपियन देश सध्या लॉकडाऊनमध्ये आहेत. त्यामुळे ही रेल्वे कधी सुरू होईल, हे सांगणे अवघड आहे.

- जसवंत सिंग, अध्यक्ष, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादrailwayरेल्वे