शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

Corona In Aurangabad : धक्कादायक ! शहरात १८६ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 14:06 IST

रात्री उशिरापर्यंत व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी

ठळक मुद्देतपासणीसाठी अनेक ठिकाणी लांबलचक रांगा'रविवारी दिवसभरात ५ हजार ३८९ व्यापाऱ्यांची घेतली टेस्ट

औरंगाबाद : कोरोना टेस्टसाठी व्यापाऱ्यांनी तपासणीसाठी एकच गर्दी केली आहे. मागील दोन दिवसांत ९ हजार व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १८६ व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. 

महापालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी तीन आरोग्य तपासणी केंद्रे रविवारी सकाळी ११ वाजेपासून सुरू करण्यात आली. व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच प्रत्येक केंद्राबाहेर गर्दी केली होती. शाहगंज, टीव्ही सेंटर आदी भागांत तर व्यापाऱ्यांनी दूरवर रांग लावली होती. टीव्ही सेंटर भागात व्यापाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन महापालिकेने हर्सूल भागातील केंद्रावरील कर्मचारी बोलावून घेतले. अतिरिक्त कर्मचारी मागून याठिकाणी तपासणी करावी लागली. रविवारी  सायंकाळी ७ वाजेपर्यंत शहरात ५ हजार ३८९ व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ९९ व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांना तातडीने महापालिकेच्या कोविड केअर सेंटरवर पाठविण्यात आले. शनिवारी महापालिकेने ४ हजार ४१८ व्यापाऱ्यांची तपासणी केली होती. त्यामध्ये ८७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत ९ हजार ८१० व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. 

६ हजार ३३२ नागरिकांची कोरोना टेस्टमहापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिक आणि शहरात येणाऱ्या प्रवाशांची रविवारी दिवसभर कोरोना चाचणी केली. दिवसभरात तब्बल ६ हजार ३३२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १३३ पॉझिटिव्ह आढळून आले. १६६ नागरिकांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. 

गुलमंडी हादरलीऔरंगपुरा येथील नाथ सुपर मार्केटमधील शिबिरात १३६ व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. गुलमंडीवरील एक व्यापारी आपल्या कुटुंबातील तीन सदस्यांची कोरोना टेस्ट करण्यासाठी आले. तिघेही पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांच्या कुटुंबातील ३० जणांची तपासणी करण्यात आली. त्यात एकूण २५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. रामनगर येथे १४ आणि संभाजी कॉलनी येथे १४ विक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यासोबतच महापालिकेने शहरातील ६ चेक पॉइंटसह काही वसाहतींमध्ये ५ हजार ६२९ नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये १६७  कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.

रविवारची आकडेवारीनाक्यावर झालेली तपासणी -७७७पॉझिटिव्ह संख्या     -३४लाळेचे नमुने     -१२सीसीसी नमुने     -१५४टास्क फोर्स टीम     - ५३८९पॉझिटिव्ह     - ९९ 

केंद्र     तपासणी पॉझिटिव्हजुना मोंढा    ३२८     ०२ अल्तमश कॉलनी     ११३    ००टीव्ही सेंटर    २५३     १४ रिलायन्स मॉल    २४३    ११ 

तीन तपासणी केंद्रांवर महापालिकेला व्यापाऱ्यांचा अतिशय कमी प्रतिसाद मिळाला. महापालिकेने दिवसभरात तीन संशयित रुग्णांच्या लाळेचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद