शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद-पुणे मार्गावर लवकरच धावणार कुलकॅब टॅक्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 18:23 IST

औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद-पुणे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत लवकरच कुलकॅब टॅक्सी सेवा मिळणार आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या मार्गावर कुलकॅब टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ५० कुलकॅब टॅक्सीची संख्या निश्चित करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते यांनी दिली.

औरंगाबाद विमानतळ कुलकॅब टॅक्सी संघटनेने औरंगाबाद-पुणे आणि पुणे-औरंगाबाद मार्गावर प्रवासी वाहतुकीची परवानगी मागितली होती. या मागणीचा विचार करून या मार्गावर प्रवाशांना पर्यायी सुविधा होण्यासाठी आणि अवैध पद्धतीने होणाऱ्या प्रवासी वाहतुकीला प्रतिबंध लावण्यासाठी कुलकॅब संवर्गात नोंद होणाऱ्या कुलकॅब टॅक्सीला प्रायोगिक तत्त्वावर परवानगी देण्याचा प्रस्ताव औरंगाबाद प्रादेशिक प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता.

प्राधिकरणाने याबाबत गुण आणि दोष तपासून या मार्गावर काही अटी आणि शर्तींच्या अधीन राहून कुलकॅब टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद आणि पुणे प्राधिकरण या मार्गावर थांबा ठरवतील. औरंगाबाद-पुणे मार्गासाठी ५० कुलकॅब टॅक्सीची संख्या निश्चित करण्यात आली आहे. औरंगाबादहून नोकरी, शिक्षणासाठी पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सुटीच्या दिवशी औरंगाबादला येण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसबरोबर आता लवकरच त्यांना कुलकॅब टॅक्सीची सेवा मिळणार आहे.

टप्पा वाहतुकीस मनाईया मार्गावर मध्येच कोणत्याही ठिकाणी टप्पा वाहतुकीप्रमाणे टॅक्सी थांबवून इतर प्रवासी घेता येणार नाहीत. प्रति प्रवासी ५०० रुपये भाडे राहील. वातानुकूलित यंत्रणा वापरावयाची नसल्यास भाड्यातून १० टक्के रक्कम वजा केली जाईल. या योजनेसंदर्भात प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करणाऱ्यांना ३० दिवसांच्या आत आरटीओ कार्यालयात हरकती, आक्षेप सादर करता येणार आहेत. हरकती, सूचनांची पूर्तता झाल्यानंतरच ही सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPuneपुणेTaxiटॅक्सी