शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कचऱ्याच्या डीपीआरमध्ये सोयीनुसार बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:44 IST

शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून राज्य शासनाने तब्बल ९० कोटी रुपये महापालिकेला देण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या संस्थेने डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार केला. या प्रकल्प अहवालात मनपा अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोयीनुसार पन्नास बदल केलेले आहेत.

ठळक मुद्दे ९० कोटी रुपयांच्या डीपीआरमध्ये तीन टप्पे ठरविण्यात आले आहेत. शासनाने १० कोटींचा निधीही मनपाला दिला आहे.

औरंगाबाद : शहरातील कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा म्हणून राज्य शासनाने तब्बल ९० कोटी रुपये महापालिकेला देण्याची घोषणा केली. त्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या संस्थेने डीपीआर (प्रकल्प अहवाल) तयार केला. या प्रकल्प अहवालात मनपा अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सोयीनुसार पन्नास बदल केलेले आहेत. राज्य शासन, केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषाबाहेर जाऊन आराखडा तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक आता या प्रकरणात कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे. 

महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. घनकचऱ्याचा अहवाल तयार करणाऱ्या पीएमसीने (प्रकल्प व्यवस्थापन समिती) सविस्तर अहवाल नमूद केला. पीएमसीच्या कामावर महापौरांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. ९० कोटी रुपयांच्या डीपीआरमध्ये तीन टप्पे ठरविण्यात आले आहेत. शासनाने १० कोटींचा निधीही मनपाला दिला आहे. मनपा प्रशासनाने २७ मशीन खरेदीसाठी निविदा प्रसिद्ध केली होती; परंतु दोन वेळा निविदा प्रसिद्ध होऊनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा प्रसिद्ध केली आहे. 

केंद्रीय पद्धतीचे कचरा प्रकल्प उभारण्यासाठीही अद्याप निविदाच काढलेली नाही. वाहन खरेदीची निविदा प्रसिद्ध झालेली नाही. डीपीआरमध्ये ओला-सुका कचरा वेगवेगळा देण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक कोटीची तरतूद आहे. त्याचीही निविदा निघालेली नसल्याची माहिती बैठकीत समोर आली. घनकचरा व्यवस्थापन असो किंवा केंद्रीय पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करणे; मनपाने सर्वच आघाड्यावर वाट लावून ठेवली आहे. आता नवनियुक्त आयुक्त याला कोणते वळण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शहरात तीन प्रकल्प घनकचरा व्यवस्थापनाच्या डीपीआरनुसार ३०० मेट्रिक टन क्षमतेचा गॅसनिर्मिती प्रकल्प चिकलठाणा येथे उभारण्यात येणार होता; परंतु आता त्यात बदल करण्यात आला असून, दीडशे-दीडशे टन क्षमतेचे तीन प्रकल्प तेही खतनिर्मितीचे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हर्सूल, पडेगाव आणि चिकलठाणा येथे हे प्रकल्प उभारण्यात येतील. कांचनवाडी येथे ३० मेट्रिक टन क्षमतेचा गॅसनिर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. 

नऊ जागा अखेर निश्चितपडेगाव, मध्यवर्ती जकात नाका, फरशी मैदान एन-७, कलाग्रामच्या बाजूला, विठ्ठलनगर, देशमुखनगर, कांचनवाडी आणि रमानगर येथे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या २७ मशीन बसविण्यात येणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद