शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेत वाद! छ. संभाजीनगरात रशीद मामूंच्या उमेदवारीवरून खैरे-दानवे आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:08 IST

उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात समन्वय नसल्याचे बुधवारी समोर आले.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेने तब्बल ९९ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. परंतु, या उमेदवारी देताना उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात समन्वय नसल्याचे बुधवारी समोर आले. "उमेदवारी ठरवताना मला विचारले गेले नाही," असा खळबळजनक दावा खैरेंनी केला आहे, तर दानवे यांनी "सर्व निर्णय शिवसेना भवनातून पक्षप्रमुखांच्या संमतीने झाले," असे म्हणत खैरे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

रशीद मामूंच्या प्रवेशावरून ठिणगीया वादाचे मुख्य केंद्र ठरले आहेत माजी महापौर रशीद मामू. दानवे यांनी रशीद मामूंचा मुंबईत नेऊन पक्षप्रवेश केला आणि त्यांना उमेदवारीही जाहीर केली. यावर खैरे प्रचंड संतापले आहेत. "रशीद मामूंच्या उमेदवारीमुळे ५० हजार हिंदू मतांचा फटका पक्षाला बसणार आहे. दानवे यांनी मला अंधारात ठेवून हा निर्णय घेतला," अशा शब्दांत खैरेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

'सगळं काही पक्षप्रमुखांच्या आदेशाने' खैरेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना अंबादास दानवे म्हणाले की, "रशीद मामूंचा प्रवेश स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून घेतला आहे. उमेदवार निवडीसाठी जेव्हा मुलाखती झाल्या, तेव्हा खैरे तिथे स्वतः उपस्थित होते. त्यामुळे मनमानीचा आरोप करणे चुकीचे आहे." खैरे ज्येष्ठ नेते असले तरी पक्षप्रमुखांचा आदेश अंतिम असल्याचे सांगत दानवेंनी चेंडू पुन्हा खैरेंच्या कोर्टात टाकला आहे. या अंतर्गत संघर्षामुळे निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena feud: Khaire and Danve clash over Rashid Mamu candidacy.

Web Summary : Uddhav Sena faces internal conflict in Chhatrapati Sambhajinagar over candidate selection. Khaire alleges disregard in Rashid Mamu's nomination, sparking a dispute with Danve, who claims party leader approval.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६