शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदारांनी आणले ‘विघ्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:10 IST

महापालिकेच्या लेखा विभागाने मागील सहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला बिल दिले नाही. शासन अनुदानावर पगार करणे आणि महिनाभर शांत बसणे एवढेच काम या विभागाने सुरू केले आहे. लेखा विभागाच्या या कारभाराला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी सकाळी मुख्य लेखाधिकारी सु.गं. केंद्रे यांना घेराव घातला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना कामे थांबविण्यात येत असल्याचे पत्रही देण्यात आले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मनपा प्रशासन संकटात सापडली आहे.

ठळक मुद्देकामबंद : ऐन गणेशोत्सवात औरंगाबाद मनपा प्रशासन संकटात; सहा महिन्यांपासून बिले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या लेखा विभागाने मागील सहा महिन्यांपासून एकाही कंत्राटदाराला बिल दिले नाही. शासन अनुदानावर पगार करणे आणि महिनाभर शांत बसणे एवढेच काम या विभागाने सुरू केले आहे. लेखा विभागाच्या या कारभाराला कंटाळलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी सकाळी मुख्य लेखाधिकारी सु.गं. केंद्रे यांना घेराव घातला. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना कामे थांबविण्यात येत असल्याचे पत्रही देण्यात आले. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मनपा प्रशासन संकटात सापडली आहे.लेखा विभागाकडे ११५ कोटी रुपयांची बिले सध्या थकली आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये आणखी ५५ ते ६० कोटींची बिले थकली आहेत. लवकरच ही बिलेही लेखा विभागात येऊन धडकणार आहेत. थकबाकीचा आकडा दीडशे कोटींपर्यंत जाईल. विकास कामांची बिले देण्याचे कोणतेच नियोजन प्रशासन, लेखा विभागाने केलेले नाही. ज्येष्ठता यादीनुसार बिले देण्यात येणार असल्याचे वारंवार कंत्राटदारांना सांगण्यात येत आहे. मनपा खरोखरच ज्येष्ठता यादीनुसार बिले देणार असेल, तर ज्यांची बिले दीड ते दोन वर्षांपासून थकीत आहेत, त्यांना आजपर्यंत पैसे का मिळाले नाहीत, याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. विकासकामे करण्यासाठी कंत्राटदारांनी खिशातील पैसा लावला आहे. आता जेव्हा पैसे देण्याची वेळ आल्यावर प्रशासन हात वर करीत आहे. त्यामुळे शनिवारी कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष बंडू कांबळे व इतर सदस्यांनी मुख्य लेखाधिकारी केंद्रे यांना घेराव घातला. केंद्रे यांनी मंगळवारी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.अत्यावश्यक सेवांची कामे बंदपथदिवे, पाणीपुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. या दोन्ही सेवांशी निगडित कंत्राटदारांनी बंडाचा झेंडा रोवला. शनिवारी विद्युत, पाणीपुरवठा विभागातील कंत्राटदारांनी कामे बंद करण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत थकबाकी मिळणार नाही, तोपर्यंत नवीन कामे करणार नाही, अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतली आहे. शनिवारी सायंकाळी संस्थान गणपती येथे काही लाईट लावायचे होते. कंत्राटदारांनी कामे करण्यास नकार दिला. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात प्रशासन अधिक संकटात सापडले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMuncipal Corporationनगर पालिका