शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नोकर भरतीला सतत मुदतवाढ; मराठवाड्यात वाढताहेत बेरोजगार तरुणांच्या फौजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 18:52 IST

‘आम्ही पदवी- पदव्युत्तर, पुढे नेट-सेट व पीएच.डी.ची पदवी घेतली. मात्र, शासनाने नोकर भरती बंद केली अन्‌ आमचे भवितव्य अंध:कारमय झाले. सांगा आता आम्ही जगायचं कसं’

ठळक मुद्देसाडेतीन हजार नेट-सेटधारक असून, पीएच.डी.ची पदवी घेणाऱ्या तरुणांचीही संख्या मोठी आहे. बेरोजगारांसाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाला भाग पाडले असते, तर हे दिवस नशिबी आले नसते,

- विजय सरवदे

औरंगाबाद : नोकर भरतीला सातत मुदतवाढ मिळत असल्यामुळे मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतरांचा सुमारे साडेआठ हजार जागांचा अनुशेष निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडणारे लाखो तरुण बेरोजगारीशी संघर्ष करत आहेत. बेरोजगारांसाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी शासनाला भाग पाडले असते, तर हे दिवस नशिबी आले नसते, असा नैराश्याचा सूर बेरोजगार तरुणांच्या चर्चेतून निघाला आहे. 

 ‘लोकमत’ने प्रातिनिधिक स्वरूपात बेरोजगार तरुणांच्या भावना जाणून घेतल्या. तेव्हा ‘आम्ही पदवी- पदव्युत्तर, पुढे नेट-सेट व पीएच.डी.ची पदवी घेतली. मात्र, शासनाने नोकर भरती बंद केली अन्‌ आमचे भवितव्य अंध:कारमय झाले. सांगा आता आम्ही जगायचं कसं’, अशा डोके सुन्न करणाऱ्या बाबी समोर आल्या. सद्य:स्थितीत मराठवाड्यात जवळपास साडेतीन हजार नेट-सेटधारक असून, पीएच.डी.ची पदवी घेणाऱ्या तरुणांचीही संख्या मोठी आहे. सन २०१२ मध्ये शासनाने नोकर भरतीवर बंदी घातली. सन २०१७ मध्ये पाच-सहा महिने ही बंदी उठवली. तेव्हा महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची भरती सुरू झाली. मात्र, केवळ गुणवत्ता असूनही काही चालले नाही. पैशांअभावी अनेकांना ‘नॉट इलिजिबल’ असा शेरा देऊन घरची वाट दाखवली. सरकारी नोकऱ्यांचेही दरवाजे बंद आहेत. नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले हजारो तरुण ‘एजबार’ होत आले. नोकरीची आशा मावळली असल्यामुळे अनेकांनी अगदी मातीकाम, मिळेल ते काम पत्करले आहे. या वर्षात तर कोरोनामुळे तासिक तत्त्वावर काम करणाऱ्या तरुणांची सेवा मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यांना नियुक्ती आदेशही मिळालेले नाहीत. पूर्वी सेवा योजन कार्यालयात बेरोजगारांच्या नोंदी व्हायच्या. काही जणांना त्या कार्यालयामार्फत नोकऱ्याही मिळाल्या. आता त्यालाही खीळ बसली आहे.

सर्व बाजूंनी बेरोजगारांची नाकेबंदीपदवीधरांच्या मतावर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी बेरोजगारांसाठी काय केले, असा सवाल बेरोजगारांनी उपस्थित केला आहे. एक तर, नोकर भरतीवरील बंदी उठविण्यासाठी शासनाला धारेवर धरायला हवे होते. दुसरीकडे, बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळी आर्थिक महामंडळे सक्षम केली पाहिजेत. स्वयंरोजगारासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करण्यासाठी दबाव वाढवला पाहिजे. बेरोजगार भत्ता सुरू केला पाहिजे.

टॅग्स :Employeeकर्मचारीMarathwadaमराठवाडाEducationशिक्षण