शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा उमेदवारीसाठी युती, महाआघाडीत दावेदार वाढणार, रंगतदार लढत होण्याची चिन्हे

By स. सो. खंडाळकर | Updated: August 25, 2023 20:14 IST

महाआघाडी आणि महायुतीमध्ये हा मतदारसंघ कुणाला सुटेल, याबद्दल आतापासूनच तर्कवितर्क सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आगामी निवडणुकीत औरंगाबादलोकसभा मतदारसंघात रंगतदार लढत होईल, अशी चिन्हे आहेत. महाआघाडी आणि महायुतीमध्ये हा मतदारसंघ कुणाला सुटेल, याबद्दल आतापासूनच तर्कवितर्क सुरू आहेत. लोकसभा उमेदवारीच्या तयारीत एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, शिवसेना उबाठाचे चंद्रकांत खैरे यांची लोकसभा निवडणूक लढविण्याच्या दिशेने तयारी सुरू असल्याचे जाणवत आहे.

महाआघाडी, युतीत अनेक दावेदारमहायुतीभाजप : विद्यमान केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवा, असा आदेश आल्याची चर्चा आहे. त्यानुसार ते कामाला लागले आहेत.शिवसेना शिंदे गट : राज्याचे रोहयो मंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.अजित पवार गट : मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे.

महाआघाडीकाॅंग्रेस : डॉ. कल्याण काळे, माजी आमदार सुभाष झांबड व अन्य काही दावेदार असू शकतात.शरद पवार गट : शरद पवार गटाकडून तसे कोणतेही नाव समोर आलेले नाही. वेळेवर काही सांगता येत नाही.उद्धव ठाकरे गट : शिवसेना उबाठाचा प्रबळ दावेदार म्हणून माजी खासदार चंद्रकात खैरे यांचेच नाव घेतले जात आहे. पण सोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याही नावाची चर्चा होत असते.इतर पक्षही तयारीत: बीआरएस, आम आदमी पार्टी यासारखे पक्षही उमेदवार उभे करू शकतात.

नेते काय म्हणतात?

महाविकास आघाडीत ही जागा काॅंग्रेसला सुटली पाहिजे, यासाठी प्रयत्न चालू आहेत. - शेख युसूफ, शहराध्यक्ष, काॅंग्रेस

मला निवडणूक लढवायला सांगितलेली आहे. मी तयारीला लागलोय. - डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थराज्यमंत्री

महाविकास आघाडीत औरंगाबादऐवजी जालना लोकसभा आम्ही मागतोय. माजी आमदार संजय वाघचौरे हे आमचे उमेदवार राहतील. - पांडुरंग तांगडे पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शरद पवार गट

मागील पाच वर्षांपासून आमची तयारी चालूच आहे. - खा. इम्तियाज जलील, एमआयएम

आमच्याकडेही उमेदवार आहेत. आमचीही तयारी चालू आहे. - कैलास पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस, अजित पवार गट आम्ही तर निवडणुकांची वाट पाहतोय. कोणतीही निवडणूक आली तर तयारच आहोत. लोकसभेसाठी उमेदवारी कुणाला द्यायची, हा निर्णय पक्ष घेईल. - किशू तनवाणी, महानगरप्रमुख, शिवसेना उबाठा

शिवसेना शिंदे गटाचीही तयारी चालू आहे. संदीपान भुमरे हे आमचे उमेदवार आहेत. - रमेश पवार, जिल्हाध्यक्ष, शिवसेना शिंदे गट

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादlok sabhaलोकसभा