नांदेड : विमा रकमेचा क्लेम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एलआयसीला ५ लाख रुपयांचा विमा रक्कम तसेच देगलूर महाविद्यालयाने दिलेल्या त्रुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये निकालापासून ३० दिवसांत द्यावेत असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे़मयत सुधीर शेट्टी हे देगलूर महाविद्यालय देगलूर येथे कनिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते़ त्यांनी एलआयसीकडून जीवन सरल नावाची पॉलिसी १८ आॅगस्ट २००९ रोजी घेतली होती़ पॉलिसीच हप्ता पगारीतून कपात करण्याबाबत त्यांनी महाविद्यालयाला कळविले होते़ महाविद्यालयाने या पॉलिसीचे दोन-तीन प्रिमियम पगारातून कपात केले़ मात्र नोटीस किंवा कल्पना न देता पुढे प्रिमियम कपात बंद केली़ तसेच सदरील कपात बंद झाल्याची एलआयसीनेही अर्जदार शेट्टी यांना कळविले नाही़ २३ फेब्रुवारी २०१० रोजी सुधीर शेट्टी यांचा अपघाती मृत्यू झाला़ मयताच्या वारसाने विमा रकमेसाठी अर्ज केला असता एलआयसीने उपरोक्त कारणास्तव विमा नामंजूर केला़ या संदर्भात वारस सुलक्षणा शेट्टी यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली़ मंचाने तिन्ही पक्षाचा पुरावा तपासून तसेच युक्तीवाद ऐकून एलआयसीला विमा रक्कम ५ लाख रुपये तसेच त्रुटीमुळे झालेली नुकसान भरपाई म्हणून देगलूर महाविद्यालयाने निकाल लागल्यापासून २५ हजार रुपये द्यावेत असा आदेश दिला़ अर्जदाराची बाजू अॅड़सुरेश पन्नासवाड आणि संतोष जोगदंड यांनी मांडली़(वार्ताहर) महाविद्यालयाने या पॉलिसीचे दोन-तीन प्रिमियम पगारातून कपात केले़ मात्र नोटीस किंवा कल्पना न देता पुढे प्रिमियम कपात बंद केली़ कपात बंद झाल्याचे एलआयसीनेही शेट्टी यांना कळविले नाही़ २३ फेब्रुवारी २०१० रोजी शेट्टी यांचा अपघाती मृत्यू झाला़
एलआयसी आणि देगलूर कॉलेजला ग्राहक मंचाचा दणका
By admin | Updated: July 9, 2014 00:12 IST