शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

मनपाकडून बांधकाम परवानगी बंद; ३000 कोटींचे व्यवसाय होणार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:18 IST

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बांधकामांची परवानगी स्थगित केल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने त्याची अंमलबजावणी म्हणून सर्व प्रकारच्या बांधकाम परवानगी देणे बंद केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बांधकामांची परवानगी स्थगित केल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने त्याची अंमलबजावणी म्हणून सर्व प्रकारच्या बांधकाम परवानगी देणे बंद केल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनीसोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून बांधकाम व्यवसायासह त्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यवसायांची मिळून सुमारे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारकडून आपली बाजू न्यायालयात मांडण्यात येणार आहे. असे असताना औरंगाबाद महापालिकेने आपल्या स्तरावर निर्णय कसा काय घेतला याचीही चर्चा शहरात चालू आहे.महापालिकेने सोमवारपासून बांधकाम परवानगी देणे बंद केले आहे. बांधकाम परवानगीसाठी नागरिक आणि बांधकाम व्यावसायिकांकडून नवीन प्रस्ताव दाखल करून घेण्यात येतील. सर्व सोपस्कर पूर्ण करून सर्व फायली मंजूरही करून ठेवण्यात येतील. मात्र या फायलींना अंतिम मंजुरी मिळणार नाही, असा निर्णय महापालिकेने घेतला आहे.महाराष्टÑ, मध्यप्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्य शासनांनी कोणतेच धोरण ठरविले नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित राज्यांच्या सरकारला दंड ठोठावत तेथील सर्व बांधकामे त्वरित बंद करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. या आदेशामुळे महाराष्टÑातील रिअल इस्टेट उद्योगात एकच खळबळ उडाली. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेतही दरवर्षी शेकडो गृहप्रकल्प उभे राहतात. नोटाबंदी, जीएसटीनंतर बांधकाम - उद्योग क्षेत्र आता नवीन भरारी घेत असतानाच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येऊन धडकला. काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय ?घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार केले जात नाही, तोपर्यंत महाराष्टÑासह काही राज्यांमध्ये नवीन बांधकामांवर बंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ३१ आॅगस्ट २०१८ रोजी दिला आहे. न्या. मदन बी. लोकूर आणि न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी अद्यापही घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार केले नाही, ही दुर्दैवी बाब आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. जनहिताचा विचार करून राज्यांनी घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार करावे.दोन वर्षांनंतरही घनकचरा व्यवस्थापनाचे धोरण तयार न करणे ही बाब दुर्दैवी (पॅथेटिक) आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी घनकचरा व्यवस्थापनाचे योग्य धोरण तयार करेपर्यंत नवीन बांधकामांवर बंदी राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. या संदर्भात आता ९ आॅक्टोबर २०१८ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.आयुक्तांची सही आज होणारसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारपासून बांधकाम परवानग्या देण्याचे काम थांबविले आहे. यासंदर्भातील आदेशावर सोमवारी आयुक्तांची सही होऊ शकली नाही. उद्या आयुक्त डॉ. निपुण विनायक यांची सही झाल्यावर आदेश काढण्यात येणार आहेत, असे प्रभारी नगररचना सहसंचालक सुमित खरवडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.क्रेडाईने चालू बांधकामे थांबविलीसर्वोच्च न्यायालयाचा कुठेच अवमान होऊ नये म्हणून क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेने सर्व सदस्यांना चालू बांधकामेही थांबविण्याचे आदेश दिले. क्रेडाईचे शहरात १५० सदस्य आहेत. प्रत्येक सदस्याचा किमान एक तरी लहान-मोठा गृहप्रकल्प सुरूच आहे. दिवाळीत ग्राहकांना फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. या निर्णयामुळे अंतिम टप्प्यात पोहोचलेले प्रकल्पही रखडले आहेत. क्रेडाईचे सदस्य नसलेले शहरात लहान-मोठे मिळून ३०० पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक आहेत. बंद कामांमुळे किमान ३ हजार कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे.-रवी वट्टमवार, अध्यक्ष, क्रेडाई, औरंगाबाद.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका