शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावरील नांदेड - जालना पट्ट्याचे १४ हजार ५०० कोटींतून बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 19:44 IST

७७ टक्के मोजणी पूर्ण : चार महिन्यात २२०० हेक्टर भूसंपादन करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट

औरंगाबाद : समृद्धी महामार्गाचा विस्तारित भाग असलेल्या प्रस्तावित जालना - नांदेड द्रुतगती मार्गासाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या एकूण जमिनीपैकी ७७ टक्के जमिनीची संयुक्त मोजणी (जेएमएस) पूर्ण झाली असून, १४ हजार ५०० कोटींतून हे बांधकाम केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे (एमएसआरडीसी) हा प्रकल्प राबविला जात असून, या मार्गासाठी लागणाऱ्या २,२०० हेक्टर जमिनीचे संपादन चार महिन्यांत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट आहे.

समृद्धी महामार्गाचा विस्तारित भाग असलेल्या जालना - नांदेड द्रुतगती मार्गाची लांबी १७९ किलोमीटर असून, ८७ गावांमधून हा मार्ग जाणार आहे. या ८७ गावांपैकी ६७ गावांमधील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

असे कमी होईल अंतर----जालना - नांदेड द्रुतगती मार्गामुळे या दोन्ही शहरांमधील २२६ किलोमीटरचे अंतर १७९.८ किलोमीटर एवढे होणार आहे. तसेच मुंबई आणि नांदेड दरम्यानचा १२ तासांचा प्रवासही निम्म्यावर येणार आहे. परभणी (९३ किलोमीटरचा पट्टा), जालना (६६.४६ किलोमीटर) आणि नांदेड (१९.८२ किलोमीटर) या तीन जिल्ह्यांतील आठ तालुक्यांतून हा द्रुतगती मार्ग जाणार आहे. प्रस्तावित जालना - नांदेड द्रुतगती मार्ग पुढे हैदराबादला जोडला जाणे अपेक्षित आहे.

२२०० हेक्टर जमीन घेणार ताब्यातसंपूर्ण ग्रीनफिल्ड प्रकल्प असलेल्या या द्रुतगती मार्गासाठी २,२०० हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार असून, बांधकामासाठी १४ हजार ५०० कोटी रुपये खर्च येणार आहे. ऑक्टोबर, २०२४पर्यंत हा द्रुतगती मार्ग बांधण्याचा एमएसआरडीसीचा संकल्प आहे. जालना - नांदेड द्रुतगती मार्गामुळे जालना, नांदेड, परभणी आणि हिंगोली हे जिल्हे उर्वरित महाराष्ट्राशी जोडले जातील.

चार महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया... या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन चार महिन्यांत पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट असून, पुढील महिन्यात मार्गाच्या बांधकामासंदर्भातील निविदा जारी केल्या जातील, असा महामंडळाला विश्वास आहे. २०२४च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मार्गाची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच त्यानुसार नियोजन करण्यात येणार आहे.- राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,एमएसआरडीसी

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादJalanaजालनाNandedनांदेडAshok Chavanअशोक चव्हाण