शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेत सेनेचे मनपा आयुक्तांवर दबावतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:40 IST

बीड बायपास रोडवरील पाडापाडीसंदर्भात सोमवारी सकाळी शिवसेनेच्या मनपातील पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदारांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यावर चक्क दबावतंत्राचा वापर केला. बायपासवरील कारवाईने शिवसेनेची मते खराब होतील, अशी भीतीही दाखविण्यात आली. काहीही करा कारवाई थांबवा, असा सज्जड दमही आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती मनपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देबंद खोलीत खलबते : मनपा पदाधिकाऱ्यांसह आमदारांची उपस्थिती

औरंगाबाद : बीड बायपास रोडवरील पाडापाडीसंदर्भात सोमवारी सकाळी शिवसेनेच्या मनपातील पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदारांनी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्यावर चक्क दबावतंत्राचा वापर केला. बायपासवरील कारवाईने शिवसेनेची मते खराब होतील, अशी भीतीही दाखविण्यात आली. काहीही करा कारवाई थांबवा, असा सज्जड दमही आयुक्तांना देण्यात आल्याची माहिती मनपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.सोमवारी सकाळी मनपा आयुक्त सुटीवरून परत येताच स्थायी समिती सभापतींच्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये आयुक्तांसोबत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मनपातील सेनेचे तिन्ही पदाधिकारी, पश्चिमचे आमदारही उपस्थित होते. तब्बल एक तासापेक्षा अधिक वेळ खलबते करण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी आवाजही चढविला होता. बीड बायपास हा एकमेव मुद्दा बैठकीत गाजत होता. आयुक्तांनी सेना पदाधिकाºयांना ठोस असे कोणतेच आश्वासन दिले नाही. बायपासवरील कारवाई थांबविण्याचे आश्वासनही दिले नाही. मी पाहतो, बघतो अशी उत्तरे आयुक्तांनी दिल्याचे सूत्रांनी नमूद केले. आचारसंहितेत शिवसेनेकडून अशा पद्धतीचे दबावतंत्र टाकता येऊ शकते का? अशी चर्चा मनपा वर्तुळात होती. स्थायी समिती सभापतींच्या अ‍ॅन्टी चेंबरमधून आयुक्त सर्वप्रथम बाहेर आले. मला विभागीय आयुक्तांकडे बैठकीसाठी जायचे आहे, म्हणून त्यांनी काढता पाय घेतला. आयुक्त गेल्यावर थोड्या वेळाने सेनेचे पदाधिकारी बाहेर आले. बाहेर पत्रकार असल्याची कुणकुण अगोदरच सेना पदाधिकाºयांना लागली होती. बैठकीतून बाहेर येताच पश्चिमच्या आमदारांनी पत्रकारांसमोर खुलासा केला की, आयुक्त वेळकाढू धोरण स्वीकारत आहेत. पडेगाव कचरा प्रकल्पाला गती द्यावी, विविध प्रलंबित विकास कामांना गती द्यावी, बायपासवरील कारवाईचे समर्थनही आमदारांनी केले. जबाबदाºया विविध अधिकाºयांवर सोपविण्यापेक्षा आयुक्तांनी स्वत: काही जबाबदारी घ्यावी, असा सल्ला दिल्याचेही त्यांनी नमूद केले. चिरंजीव प्रसाद, ओम प्रकाश बकोरिया यांच्यामुळेच बायपासवरील कारवाई करण्यात आली. या कारवाईला ब्रेक लागू नये अशी अपेक्षाही त्यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली. वास्तविक पाहता पत्रकारांनी बायपासच्या मुद्यावर एकाही सेना पदाधिकाºयांना छेडले नव्हते.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण